२५ वर्षे सत्तेत असूनही शेतीचे पाणी, आरोग्य, रोजगाराचे प्रश्न सोडवण्यात विद्यमान आमदार अपयशी
पुरुषोत्तम जाधव यांची खंडाळा येथील सांगता सभेत जोरदार टीका
खंडाळा/ प्रतिनिधी गेली २५ वर्षे हून अधिक काळ एकाच घरात सत्ता असूनही या सत्ताधाऱ्यांना वाई खंडाळा महाबळेश्वर चे शेतीच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्याच्या सुविधा, उच्च शिक्षणाच्या पायाभूत सुविधा व रोजगाराचा प्रश्न सोडवता आला नाही. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे हा मूलमंत्र अवघ्या महाराष्ट्र दिला मात्र वाई चे विद्यमान आमदारांनी मात्र यशवंत विचाराला तिलांजली देत,घरातच सत्तेचे केंद्रीकरण केले आहे. मतदारसंघात हुकूमशाही पद्धतीने कार्यकर्त्यांना व मतदारांना वागवण्याची विद्यमान आमदारांची कार्यपद्धत असून आता मी सक्षम तिसरा पर्याय जनतेसमोर दिला आहे. आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मला साथ द्या असे आवाहन अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी खंडाळा येथील सांगता सभेत केले.
यावेळी पुरुषोत्तम जाधव म्हणाले,वाई तालुक्यात दोन दोन धरणे असताना १५ वर्षे संधी दिलेल्या आमदाराच्या निष्क्रियतेमुळे आपल्याच तालुक्याचे हक्काचे पाणी दुसरीकडे गेलेच कसे ? यावेळी आपण काय करीत होता? ते नक्की कुणी पळवल असा यावेळी केला.
पुढे पुरुषोत्तम जाधव म्हणाले, वाई तालुका दुष्काळी जाहीर करावा लागतो हे त्यांचे अपयश आहे पण विशेष प्रयत्नातून वाई तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करून घेतला म्हणून आनंद साजरा करणारा देशातील पहिला आमदार आपल्या मतदार संघाला लाभला
हे मतदार संघाचे सगळ्यात मोठे दुर्दैव आहे.तीन टर्म सत्ता भोगुनही कुचकामी ठरलेल्या आमदारांकडून साडे चार हजार कोटी रुपयांचा निधी आणला म्हणून प्रचार सुरू आहे
पण ..मतदार संघातील मूलभूत समस्या त्याच आहेत.दोन दोन धरणे असलेल्या वाई तालुक्यात ५० वर्षे दुष्काळी राहिलेल्या वासोळे ते वेळे पर्यंतच्या ४०गावांना पाणी पोहोचवून पाणीदार केले असते आणि ४० गावे दुष्काळ मुक्त केली म्हणून आनंद साजरा केला असता तर आम्ही सुद्धा नक्कीच कौतुक केले असते.परंतु दुर्दैवाने हे विद्यमान आमदारांना अपयश आहे.खोटं बोल पण रेटून बोल हा फॉर्म्युला यंदा चालणार नाही हाच संदेश मतदार बांधवांनी लाभनायक आमदाराला दिला आहे. …
खंडाळा तालुक्याच्या पाणी प्रश्नाचा पुळका आलेल्या विद्यमान आमदारांना गेल्या पंचवीस वर्षात पाणी प्रश्न का सोडवता आला आहे नाही? खंडाळा तालुक्याचा फक्त मतापुरता वापर करणाऱ्या मूकनायक आमदारांना त्यांची जागा दाखवून द्या. वडील १०वर्षे खासदार हे १५ वर्षे आमदार अशी २५वर्षे सत्ता घरात असूनही यांना वाई तालुक्यातील कवठे केंजळ योजना देखील पूर्ण करता आली नाही .वाई शहराला भेडसावणारा पार्किंग चा प्रश्न सोडवता आला नाही.ज्या किसनवीर आबांच्या नावाने राजकारण करतायत त्यांचे स्मारक अद्याप धूळखात पडलेय ते सुशोभित करता आले नाही आणि आता विधानसभा निवडणुकीत यांना खंडाळ्यात ट्रॉमा सेंटर उभे करण्याची आठवण झाली आहे.पाण्याची एक थेंबही तालुक्याबाहेर जाऊ देणार नाही याची आठवण झाली मग १५वर्षे काय केले? असा थेट सवाल वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी विद्यमान आमदारांना केला आहे.
बाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील तरुण पिढी गुंडगिरी व व्यसनाधीनतेच्या मार्गाला लागली असून हजारो कुटुंब यामुळे उध्वस्त झाली आहेत. मतदारसंघातील युवकांच्या हाताला काम नाही .मात्र लाभनायक आमदारांनी गावोगावी युवकांची ससेहोलपट चालवली आहे. या झुंडशाहीला जाब कोण विचारणार? सर्वच सत्ता त्यांच्या घरात असल्याने जनतेने न्याय मागायचा कुणाकडे? मात्र आता तरुण पिढीने न भीता समोर येऊन विद्यमान आमदारांना जाब विचारण्याची गरज आहे. असे मत यावेळी पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केले.
खंडाळा शहरातून जोरदार प्रचार रॅली अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी खंडाळा शहरातून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत प्रचार रॅली काढली व खंडाळा तालुक्यातील मतदारांना भूमिपुत्राला मदत करण्याचे मदत करण्याचे आवाहन यावेळी केले