देेशमुख सिटीत भरला ‘फूड फेअर’मुलांनी दाखविले व्यवहारिक कौशल्य; पालकांनी केले कौतुक
मुलांनी विविध पदार्थांची विक्री करण्यासाठी लावलेले स्टॉल.
सातारा ( प्रतिनिधी)-शालेय सुट्टया लागल्याने मुलांची फूल्ल टू धमाल सुरु आहे. या सुट्टयांतच साताऱ्यातील देशमुख सिटी येथील चिमुकल्या मुलांना व्यवहार ज्ञान मिळवण्यासाठी ‘फूड फेअर’ची धमाल केली. खवय्यांची भूक भागवण्यासाठी त्यांनी चक्क स्वत: काही स्नॅक्स पदार्थ बनवून पालकांची मने जिंकली.
शाळांना सुट्टया लागल्या असल्याने अनेक मुले गावांकडे, तर काही मुले सातारा शहरातच सुट्टयांचा आनंद घेण्यात मग्न आहेत. खासगी शिकवण्याही बंद असल्याने मुले पूर्णवेळ खेळण्याचा, प्रवासाचा आनंद लुटत आहेत. सुट्टयांचा उपभोग घेत असतानाच साताऱ्यातील देशमुख सिटी येथील मुलांनी एकत्रित येवून ‘फूट पार्टी’ करण्याचे ठरविले. त्यावेळी काही मुलांनी आपणच पदार्थ बनवून खाण्याचा विचार मांडला, तर काही मुलांनी हे पदार्थ पालकांना विक्री करण्याचा सुचवले. त्यातून ‘फूड फेअर’ची संकल्पना त्यांनी ठरविली.
फूड फेअरचे उद्घाटन बांधकाम व्यावसायिक, बिल्डर असोसिएशन ऑफ साताऱ्याचे माजी चेअरमन राजेश देशमुख यांच्या हस्ते केले. यावेळी सोसायटीचे चेअरमन सचिन मस्कर, सद्स्य किरण शिंदे यांच्यासह सभासद उपस्थित होते.
हे विकले पदार्थ
पाणीपुरी, शेवपुरी, भेळ, मसाला पापड, मॅग्गी, स्विट कॉर्न,
आंबा जूस, विविध जूस, आमरस, मंच्युरिअन, लॉलीपॉप, थंड पेय, केक, ढोकळा, तेलंगणा येथील पध्दतीने बनवलेला रवा लाडू आदी पदार्थ मुलांनी पालकांच्या मदतीने करुन ते विक्रीस ठेवले.
मिळाले व्यवहार ज्ञान
पदार्थांची विक्री करत असताना त्याची किंमत किती, पालकांनी किती पैसे दिले, त्यांना किती परत दिले, याची आकडेमोडही मुले खूप सहजतेने करत होते. शिवाय, आमचा अमूक अमूक पदार्थ चांगला आहे, त्याचा आस्वाद घ्या, असे सांगून पालकांनी भूरळही घालत होते.
पालकांना सरप्राईज
मुलांनी फूड फेअरचे नियोजन एकत्रित येवून केले. त्याची कानकून पालकांना लागूनही दिली नाही. मुलांनी पालकांना बोलावून घेत थेट सरप्राईज दिले. त्यामुळे पालक वर्गही अचंबित झाला. त्यांनी मुलांचे भरभरुन कौतुक केले.
या मुलांचा सहभाग
देशमुख सिटीतील दर्पण, रिद, स्वराज, महावीर, शिवांश, सार्थक, दक्ष, स्वदेश, अबीर, कबीर, बंडी विहान, अश्विन, राजवीर, रणवीर, विहान, पृथ्वीराज, आरोही, दृष्टी, वीरा, नेहा, स्वरा, श्रावणी, श्रीनंदना, परी, जुई, राजनंदिनी, शिवन्या.
