दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठानचे आदर्श पालक- विद्यार्थी पुरस्कार जाहीर
वाई प्रतिनिधी -(सुनिल जाधव -पाटील) वाई येथील दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठानचे आदर्श पालक-विद्यार्थी पुरस्कार रोहन सुभाष जाधव (कवठे) व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त एकता दिलीप शिर्के (पसरणी) यांना जाहीर झाले.
दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणदिनी शुक्रवारी (ता.६) रोजी विदर्भातील कवी अनंत राऊत, महादेव शिवाचार्य वाईकर महाराज, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, अजयकुमार सिंदकर आदींच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती ऍडव्होकेट विनायक मेणबुदले, विश्वजीत मेणबुदले यांनी दिली.
प्रतिकूल परिस्थितीत पाल्याला घडविणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे. ११ हजार रुपयेच रोख, सन्मानचिन्ह मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रतिष्ठानमार्फत घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेचे बक्षीस विचरण समारंभ यावेळी करण्यात येणार आहे.प्रतिकूल परिस्थितीत पाल्याला घडविणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे. ११ हजार रुपयेच रोख, सन्मानचिन्ह मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रतिष्ठानमार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात येणार आहे. साठे मंगल कार्यालय येथे दिनांक ०६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. महेश मेणबुदले व दत्तात्रेय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठाण यांनी केले आहे.