दक्षिण काशी’ वाईतील लघु कुंभमेळा २०२६ ला भव्य शुभारंभ; अध्यात्म, संस्कृती आणि हिंदुत्वाचा दिव्य संगम-मंत्री जयकुमार गोरे
दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पावन वाई नगरीत आयोजित ‘लघु कुंभमेळा २०२६’ च्या शुभारंभाचा मान मिळणे, ही माझ्यासाठी अत्यंत समाधान आणि अभिमानाची बाब आहे असे जयकुमार गोरे म्हणाले.
कृष्णामाईच्या पवित्र तीरावर आयोजित करण्यात आलेला हा लघु कुंभमेळा केवळ धार्मिक सोहळा नसून हिंदुत्वाच्या संस्कारांचा, अध्यात्मिक परंपरेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा भव्य उत्सव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आयोजक, साधुसंत, नगराध्यक्ष अनिल सावंत, सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे हा दिव्य सोहळा यशस्वी होत आहे. वाईच्या या लघु कुंभमेळ्याची महती संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल, असा मला विश्वास आहे असे मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
२०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी तयारी करत असून, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाविकांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री महोदय जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले
वाईकर नागरिक, भाविक आणि संत-महंत यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या पवित्र सोहळ्याला अधिक दिव्यता लाभली. यावेळी गुजरातहून आलेले परमपूज्य महंत महादेवगिरी महाराज, योगेंद्रगिरी महाराज, नगराध्यक्ष अनिल सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, युवा नेते विराज शिंदे, पंचायत समिती सदस्य स्वप्निल गायकवाड, उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के, विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे, प्रदेश उपाध्यक्ष सचिन घाटगे, मंदिर महासंघ तालुकाध्यक्ष श्रीधर भाडळकर, राजेंद्र पुजारी, कृष्णा नदी सेवा समितीचे सदस्य काशिनाथ शेलार, सचिन सावंत, निलेश मोरे, प्रवीण जाधव, निखिल जाधव, संतोष जमदाडे, संग्राम पाडळे तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका, वाईकर नागरिक, साधुसंत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




