Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » राष्ट्रीय शिव सह्याद्री पुरस्काराने दादासाहेब शेडगे यांचा सन्मान

राष्ट्रीय शिव सह्याद्री पुरस्काराने दादासाहेब शेडगे यांचा सन्मान

राष्ट्रीय शिव सह्याद्री पुरस्काराने दादासाहेब शेडगे यांचा सन्मान

    तांबवे -सातारा येथील धन्वंतरी जनकल्याण सामाजिक संस्था व समृद्धी प्रकाशन व सावली फाउंडेशन महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट 2024 या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 100 रत्नांचा सत्कार समारंभ वेणूताई स्मारक कराड येथे नुकताच संपन्न झाला. 

       जिल्हा परिषद शाळा कार्वे मुली या शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब धनाजी शेडगे यांना ग्लोबल आयडियल इन्स्पायरिंग टीचर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. गेली 32 वर्ष त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, सहकार व संघटनात्मक कामाचा या निमित्ताने गौरव करण्यात आला. पुरस्कारांचे वितरण प्रसिद्ध अभिनेते अजय तपकिरे व प्रसिद्ध सिने दिग्दर्शक व संगीतकार अतुल दिवे यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी शालेय पोषण आहार अधीक्षक विजय परीट, डॉ. राजकुमार घारे यांची उपस्थित होती.

दादासाहेब शेडगे यांच्या या यशाबद्दल त्यांचे सातारा जि प चे माजी शिक्षण सभापती संजय देसाई, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, गटशीक्षणाधिकारी बिपिन मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी निवास पवार, केंद्रप्रमुख राजेंद्र कुंभार, सरपंच सर्जेराव कुंभार, वैभव थोरात, प्रदीप रवलेकर , दीपक पवार , वैभव पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राणी घाडगे , शाळेतील सर्व शिक्षिकांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारचे साहित्य संमेलन दिशादर्शक ठरेल विनोद कुलकर्णी यांच्या सत्कारप्रसंगी डॉक्टर सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

Post Views: 29 सातारचे साहित्य संमेलन दिशादर्शक ठरेल विनोद कुलकर्णी यांच्या सत्कारप्रसंगी डॉक्टर सदानंद मोरे यांचे प्रतिपादन सातारा प्रतिनिधी-सातारा ही

Live Cricket