नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल कोयनानगर येथे विद्यार्थिनींसाठी सायकल बँक सुरू
सातारा -जयवंतराव शेलार जनकल्याण प्रतिष्ठान व रोटरी क्लब सातारा सेवेन हिल्स यांच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल कोयनानगर येथे विद्यार्थिनींसाठी सायकल बँक सुरू करण्यात आली.
कोयना विभाग हा दुर्गम विभाग म्हणून ओळखला जातो या विभागांमध्ये कोयनानगर या मध्यवर्ती ठिकाणी माध्यमिक विद्यालय उपलब्ध आहे या परिसरातून पायी येणाऱ्या विद्यार्थिनींना दीड दोन तास पायी प्रवास करावा लागतो हा त्यांचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी व हाच वेळ त्यांना अभ्यासामध्ये देता यावा या हेतूने जयवंतराव शेलार जनकल्याण प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ सातारा सेवेन हिल्स यांच्या वतीने विद्यालयांमध्ये सहा सायकल देण्यात आल्या. याप्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष रो. अमित बेंद्रे जयवंतराव शेलार जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रकल्प प्रमुख रो. डॉ. नरेंद्र शेलार,उपाध्यक्ष अजय देसाई महादेव येडगे शाळेचे मुख्याध्यापक श्री देसाई सर व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कोयनानगर परिसरामध्ये शैक्षणिक व सामाजिक कार्यामध्ये जयवंतराव जनकल्याण प्रतिष्ठान अनेक उपक्रम राबवित असते. परिसरातील सर्वसामान्यंसाठी प्रतिष्ठान कटिबद्ध आहे.
डॉक्टर नरेंद्र शेलार अध्यक्ष
