सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा स्तुत्य उपक्रम -डॉ. चंद्रकांत नलावडे
आजकालच्या वाढत्या ऑनलाईन युगामध्ये होणारे घोटाळे म्हणजेच सायबर गुन्हे होय. या सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे याला आळा घालण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वर्ये आणि क्विक हिल फौंडेशन, सातारा हॉस्पिटल &सातारा डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा”या उपक्रमांअंतर्गत कु शलाका जाधव व कु अदिती चव्हाण या दोन विद्यार्थिनींनी, सातारा डायग्नोस्टिक सेंटर, सातारा येथे कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्थेच्या मासिक सभेमध्ये पदाधिकारी,सदस्य यांना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन दिले.
विद्यार्थांनीनी नवनवीन घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांची जाणीव करून दिली. सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रमचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये सायबर जनजागृती निर्माण करणे, वेगवेगळ्या सायबर गुन्ह्यांची माहिती करून देणे तसेच त्या गुन्ह्यांपासून कसे सुरक्षित राहिले पाहिजे याची माहिती करून देणे. निवृत्त ज्येष्ठ नागरिक त्यांच्या मोकळ्या वेळात मोबाईल वरून वेगवेगळ्या गोष्टी करतात त्या गोष्टी करताना त्यांची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून विद्यार्थिनींनी उत्तम मार्गदर्शन केले. तसेच आजकालच्या ऑनलाईन युगामध्ये होणारे सायबर गुन्हे कसे रोखता येतील याबद्दल माहिती दिली.
विशेषतः विविध बँकिंग घोटाळे कशाप्रकारे होतात, आपण त्यामध्ये कसे अडकलो जातो, कोणत्या गोष्टी करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत याबद्दल सर्व उपस्थित सदस्य यांना जागरूक केले.मोबाइलवर कोणतीही वैयक्तिक माहिती सांगू नका असे सांगण्यात आले. शेवटी सर्व उपस्थित सदस्यांनी सुरक्षिततेची शपथ घेतली.
यावेळी या कार्यक्रमाअंतर्गत सुरुवातीला संस्था पदाधिकारी व सदस्य यांचे वाढदिवसानिमित्त डॉ. चंद्रकांत नलावडे सर व व्यासपीठावरील मान्यवर यांनी कु शलाका जाधव, कु आदिती चव्हाण यांचा पुष्पगुच्छ व गुलाब पुष्प देऊन सत्कार केले.
या प्रबोधन, प्रचार व प्रसार कार्यक्रमा साठी सातारा हॉस्पिटल & सातारा डायग्नोस्टिक सेंटरचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ सुरेश शिंदे सर,डॉ जयश्री शिंदे व सी ई ओ श्री विक्रम शिंदे, स्टाफ कर्मचारी व व्यवस्थापन यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे नियोजन सातारा हॉस्पिटल & सातारा डायग्नोस्टिक सेंटरचे मॅनेजर पब्लिक रिलेशन मॅनेजर श्रीकांत देशमुख यांनी केले.