बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने सातारा येथे ग्राहक संवाद आणि आउटरीच कार्यक्रमाचे आयोजन
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र सातारा अंचल कार्यालयाने 04. सप्टेंबर 2024 रोजी सातारा येथील हॉटेल महाराजा रिजन्सी येथे ग्राहक संवाद आणि आउटरीच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बँकेचे सन्मानित ग्राहक व नामांकित बिल्डर श्री.श्रीधर कंग्राळकर व आघाडीचे उद्योजक श्री श्रीकांत पवार टॉप गिअर ट्रान्समिशन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रिटेल, एमएसएमई, कृषी,कॉर्पोरेट, निर्यात-आयात, परकीय चलन व स्टार्ट-अप इत्यादी क्षेत्रातील मान्यवर ग्राहक व नवउद्योजक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
बँकेचे उप-अंचल प्रबंधक श्री. शशिकुमार यांनी उपस्थित ग्राहकांचे स्वागत आणि मार्गदर्शन केले.
या दरम्यान बँकेच्या विविध ठेव आणि कर्ज योजनांची माहिती बँकेचे अधिकारी रणजितसिंह भोसले व निकिता राऊत यांनी दिली.
कार्यक्रमाला संबोधित करताना सातारा क्षेत्रीय प्रबंधक श्री सौरभ सिंह म्हणाले की, बँक या महिन्यात आपला 90 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यासाठी देशभर ग्राहकांशी संपर्क अभियान राबवत आहे. आम्ही आमच्या असंख्य ग्राहकांना आर्थिक समृध्दी साठी सर्वतोपरी मदत करणेसाठी ग्राहक-अनुकूल कर्ज व ठेवी योजना आणल्या आहेत. श्री सौरभ सिंह म्हणाले, “आम्हाला ग्राहक संवाद कार्यक्रमाच्या.रूपाने अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे” ज्यामुळे बँकेला नवीन ठेव व कर्ज योजना/उत्पादने तयार करण्यात आणि आणखी सुधारणा करण्यात मदत होत आहे बँकेला ग्राहकांचे भक्कम पाठबळ मिळत आहे, ज्यामुळे व्यवसायाला भरीव आधार मिळाला आहे. त्यांनी डिजिटल बँकिंग चॅनेलचे वाढते महत्त्व आणि ग्राहकांच्या उदयोन्मुख गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेने घेतलेल्या नवीन आणि सक्रिय उपायांवरही प्रकाश टाकला.
या कार्यक्रमांत सन्मानिय ग्राहक श्री. रितेश रावखंडे रेणुका पेट्रोलियम, श्री. अशोक कांबळे सर, श्री श्रीधर कंग्राळकर , श्री. श्रीकांत पवार यांनी आपले मनोगत आणि मार्गदर्शन केले.
“ग्राहक संवाद” कार्यक्रमाची सांगता करणेसाठी मुख्य प्रबंधक श्री. सागर मोरे यांनी उपस्थित ग्राहकांचे आभार मानले.