कृतिशील युवा नेत्तृत्व -विकास(आण्णा)शिंदे (वाढदिवस विशेष )
वाढदिवस युवा नेतृत्वाचा,तडफदार नेत्याचा,
कृतिशील आणि अभ्यासू नेतृत्वाचा इथं आश्वासन नाही काम बोलतं वाईच्या पश्चिम भागाच्या विकासासाठी ज्यांचं सर्वात मोठं योगदान असे युवकांच्या गळ्यातील ताईत युवा नेतृत्व विकास(अण्णा शिंदे )यांचा आज वाढदिवस…
सातारा :एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील आक्रमक राजकीय युवा नेत्या चा आज वाढदिवस आहे. अगदी कमी वयात विकास (अण्णानीं )आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. वडील दिनकर शिंदे साहेब यांच्या समृद्ध राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवण्याची शिकवणही वडिलांकडूनच मिळाली असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा असणार नेतृत्व म्हणजे विकास(अण्णा )शिंदे. सातारा जिल्ह्यात तरुणात ज्याची (अण्णा )म्हणून ज्यांची ख्याती आहे. आपली धडाकेबाज कर्तव्यतत्परता, कृतिशील आक्रमकता, निर्णय होईपर्यंत समस्यांचा केला जाणारा पाठपुरावा, नागरी समस्यांचे निराकरण करताना त्यासाठी उपलब्ध करून दिलेले पर्याय, अशा सर्वच पातळीवर केलेले कार्य वेगळे आणि दखलपात्र ठरावे असें आहे.
विकास (अण्णा )यांना मी तसं पाहतोय ते सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन त्याच बरोबर एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील राजकीय नेत्याची आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अगदी कमी वयात यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. वडील मा.दिनकर शिंदे साहेब यांच्या समृद्ध राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, मित्र व कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत तर ते टिकवण्याची शिकवणही वडिलांकडूनच मिळाली असल्याचे दाखवून दिले आहे.
समाजमाध्यमांमध्ये विकास (अण्णा )शिंदे सर्वात अधिक सक्रिय असणारे युवानेते आहेत. त्यांच्या एका हाकेला हजारोंच्या संख्येने युवकांचा प्रतिसाद असतो , तर संपूर्ण वाई च्या जनतेने, खासकरून युवावर्गाने जणू शिक्कामोर्तबच केल्याचे स्पष्ट होत आहे. या यशामागे विकास (अण्णा )यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत केलेल्या अपार मेहनतीचा आणि एकसंध ठेवलेल्या कार्यकर्त्यांच्या फळीचा वाटा आहे. पिता -पुत्रांनी नेहमीच कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. कार्यकर्त्यांमधील गुण अचूक हेरून त्यांना संधी देण्याचे काम विकास (अण्णा)नेहमीच केले.
आपल्या संघर्षा च्या बळावर वडिलांच्या पायावर पाऊल ठेवत त्यांनी हजारो युवकांचे नेटवर्क तयार केले. सर्व युवकांना एकत्र करत आपल्या सामाजिक कार्या ची सुरुवात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना वाढवण्याचे काम विकास अण्णा करत आहेत .अनेक प्रश्न सोडवत आहेत सर्वांच्या मदतीला धावत अहोरात्र वाई करांच्या सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी त्यांनी स्वतः ला झोकून दिले.असे दिलदार व्यक्तिमत्व. एवढ्या वरच ना थांबता ते असेच सर्वाना सोबत घेऊन चालत राहिले त्याच शैक्षणिक, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात पण खूप योगदान दिल आणि अजून पण त्याच कार्य सुरु च आहे.
निवडणुका असो अथवा सामाजिक उपक्रम विकास(अण्णा )यांनी परफेक्ट मॅनेजमेंटचा पाठ दाखवून दिला आहे. टाकलेला प्रत्येक डाव अचूक परिणाम साधणारा ठरला, ते राजकारणात खणखणीत नाणे ठरले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना वाई तालुक्याच्या पश्चिम भागातून सर्वात जास्त मतदान विकास(अण्णा )शिंदे यांच्या नेतृत्वात झाले.
अगदी कमी वयात विकास (अण्णा )यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली . विकास (अण्णा )चा आजवरचा वादळी प्रवास यांचा राजकीय झंझावात, अचूक निर्णय क्षमता आणि त्यांच्या एका हाकेस हजारो शी युवकांची फळी त्यांच्या पाठीशी जमा होणारे, जीवाला जीव देणारे कार्यकर्त्यांचे मोहोळ पाहता विकास (अण्णा ) सातारा जिल्ह्याच्या नव्या राजकीय समीकरणातील आश्वासक तरुण चेहरा ठरतील.
वाढदिवस एका….. विशाल अथांग सागराचा,
वाढदिवस एका…. वाईच्या वाघाचा,
मा.विकास शिंदे (अण्णा )आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
(अली मुजावर, न्यूज हेड सातारा न्यूज मिडिया 7)