कूपर कॉर्पोरेशनला ‘मॅन्युफॅक्चरींग टुडे’ द्वारे ‘उत्कृष्ट मानव संसाधन 2024’ पुरस्कार
कूपर कॉर्पोरेशनने प्रख्यात ‘मॅन्युफॅक्चरींग टुडे’ ग्रुपद्वारे आयोजित 2024 च्या वार्षिक परिषद आणि पुरस्कार 2024 मध्ये ‘उत्कृष्ट मानव संसाधन’ 2024 श्रेणीत उपविजेते पद पटकाविले. हा पुरस्कार समारंभ नुकताच सोफिटेल हॉटेल, मुंबई येथे पार पडला. कूपर कॉर्पोरेशनच्या वतीने कंपनीचे संचालक श्री. बेहराम अर्देशीर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
‘मॅन्युफॅक्चरींग टुडे’ हि भारतातील आघाडीची प्रकाशन संस्था असून लघु, मध्यम व मोठे उत्पादन करणा-या औद्योगिक संस्थातील तंत्रज्ञान, लोक आणि प्रक्रिया यांच्या नाविण्यपूर्ण विकासावर भर देत आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून ऑपरेशन्समध्ये स्मार्ट तंत्रज्ञान, शाश्वत पद्धतीचा अवलंब, नाविण्यपूर्ण उपाय करणा-या संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून उद्योगांमध्ये ज्ञानाची देवाण घेवाण आणि सहयोग सुलभ करणे हा हेतू आहे.
भारतातील औद्योगिक प्रगतीचा प्रचंढ वेग व नजिकच्या काळात भारताची तिसरी आर्थिक महासत्ता होण्याची आकांक्षा, यावर या पुरस्कार सोहळयात भर देण्यात आलेला होता उद्योगामध्ये भांडवल, कच्चा माल, औद्योगिक उपकरणे यांच्या बरोबरच कुशल व वचनबद्ध मनुष्यबळ यांची स्पर्धेच्या युगात अत्यंत आवश्यकता आहे. ज्या उद्योगामध्ये मनुष्यबळ विकासांवरती नाविण्यपूर्ण पद्धतीने भर देण्यात येतो अशा उद्योगांना उत्कृष्ट मानव संसाधन हा पुरस्कार दिला जातो.
कूपर कॉर्पोरेशन हि साता-यातील 102 वर्षाची परंपरा असलेली व सर्वात जास्त संख्येने रोजगार उपलब्ध करून देणारी औद्योगिक संस्था आहे.त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कूपर अनेक विविध प्रकल्प राबवित आहे. कूपर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री फरोख कूपर यांनी या पुरस्काराबद्दल श्री. नितीन देशपांडे मुख्य मानव संसाधन अधिकारी, श्री सचिन खटावकर डेप्युटी जनरल मॅनेजर आय आर,एच आर विभागातील अधिकारी तसेच सर्व कामगार व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.