पाचव्या MAS काइझेन स्पर्धेत कूपर कॉर्पोरेशनला पुरस्कार
सातारा :मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन ऑफ सातारा (मास) च्या वतीने १५० पेक्षा कमी आणि १५० हून अधिक कामगार असलेल्या उद्योगांसाठी पाचव्या काइड्रोन स्पर्धेचे शनिवारी (२१-सप्टेंबर-२४) रोजी मास भवन, सातारा येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दोन्ही गटात विविध संस्थांमधून एकूण १८ संघांनी सहभाग घेतला होता व कूपर कॉर्पोरेशन मधून एकूण ३ संघ सहभागी झाले होते.विशेषतः या काइझेन स्पर्धेत कंपनीतील कामगारानी प्रतिनिधित्व केले होते. यामध्ये १५० हून अधिक कामगार गटात कूपर कार्पोरेशनने तृतीय क्रमांकाचे विजेते पारितोषिक पटकावले.
M60 फौंडी शॉप मधुन श्री दीपक कुरळेकर व श्री. विजय पवार यांनी सादरीकरण केले होते. J1मशीन शॉप मधून श्री. महेश फाळके आणि श्री. तौसिफ शेख यांनी सादरीकरण केले होते. आणि क्रॅंकशाफ्ट प्लांट मधून श्री.विशाल पवार आणि श्री. विकास वांगडे यांनी सादरीकरण केले होते, जो त्यांनी “व्यास कमी आकाराच्या दोष घटना रोखण्यासाठी कायझेन प्रकल्पाची अंमलबजावणी केली होती आणि हा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.
या स्पर्धेसाठी मास कार्यकारिणी सदस्य, उदयोजक आणि प्रतिनिधी उपस्थित होते. कूपर कार्पोरेशन चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री फरोख एन. कूपर यांनी सर्व कामगार व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.