Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » कूपर ब्रँड ट्रॅक्टरर्सचे” शेंद्रे येथे प्रात्यक्षिक व प्रदर्शन

कूपर ब्रँड ट्रॅक्टरर्सचे” शेंद्रे येथे प्रात्यक्षिक व प्रदर्शन

कूपर ब्रँड ट्रॅक्टरर्सचे” शेंद्रे येथे प्रात्यक्षिक व प्रदर्शन

सातारा :शेंद्रे येथे नुकतीच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लि. शेंद्रे,सातारा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेच्या ठिकाणी कूपर कॉर्पोरेशन प्रा.लि.च्या कूपर ब्रँड ट्रॅक्टरचे प्रदर्शन हे सातारा पंचक्रोशीतील सर्व सभासद शेतकरी वर्गाचे विशेष आकर्षण व खास पसंती ठरली .

कूपर उद्योगातर्फे ५० HP मध्ये NDC5000 (12×12-4WD) व NDC5001 (12×12-2WD) असे दोन मॉडेल्स् व एक डेमो ट्रॅक्टर प्रदर्शित करण्यात आलेले होते. कूपर ब्रँड ट्रॅक्टर प्रदर्शनास मोठा प्रतिसाद देत एकूण ५२०० सभासद शेतक-यांनी भेट दिली. ट्रॅक्टरर्सचे आकर्षक डिजाइन, अॅरो डायनॅमिक शेप, कम्फर्ट तसेच ट्रॅक्टरच्या गुणवत्तेबद्दल मनापासून कौतुक करत आपला अभिप्राय व्यक्त केला. तसेच पुढिल वाटचालीस समर्थ साथ दर्शविली .

प्रदर्शनास कूपर ब्रँड ट्रॅक्टरला मा.आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच श्री.जिवाजी शामराव मोहिते व्यवस्थापकीय संचालक,अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लि. शेंद्रे यांनी भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.

कूपर उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.फरोख कूपर साहेब यांच्या मार्गदर्शनाने श्री.अस्लम फरास – चिफ कमरशिअल ऑफिसर यांच्या नेतृत्वाखाली श्री. पंकज आरोरा, श्री. प्रमोद पोपळे, श्री. शमराव जाधव, श्री. ओंमकार पोतदार व सर्व ट्रॅक्टर टिमने सदर कूपर बॅण्ड ट्रॅक्टरच्या प्रदर्शनाचे आयोजन केले .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 10 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket