Home » ठळक बातम्या » कोलंबिया भूकंपानं हादरलं, देशात आणीबाणी लागू

कोलंबिया भूकंपानं हादरलं, देशात आणीबाणी लागू

कोलंबियात सोमवारी ७.४ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंप झाला आहे. या भूकंपात किमान ७७ लोकांचा मृत्यू झाला असून, इमारती कोसळल्याने अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. कोलंबियाच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील चोको प्रांतातील सान जोस देल पाल्मार जवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाचे धक्के राजधानीसह प्रमुख शहरांमध्ये तसेच शेजारील इक्वाडोरमध्येही जाणवले.

अनेक इमारती कोसळल्या

शेजारील व्हेनेझुएलामध्ये याप्रमाणेच झालेल्या भीषण भूकंपात ६,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. नुकतेच पदभार स्वीकारलेले राष्ट्राध्यक्ष अबेलादो दे ला एस्प्रिएला यांच्यासमोर या नैसर्गिक आपत्तीच्या रूपाने पहिले मोठे संकट उभे ठाकले आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, रिसालदामध्ये सर्वाधिक मृत्यू झाल्याचे वृत्त असून, ४२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गव्हर्नर हुआन दिएगो पातिणो यांनी दिली. परेरा येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भागात अनेक इमारती कोसळल्या आहेत.

कलीमध्ये या भूकंपाने मोठ्या प्रमाणावर नुकसान

कोलंबियातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या कलीमध्ये या भूकंपाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. कलीचे महापौर अलेजांद्रो एडर यांनी २५ इमारती कोसळल्याची आणि नागरिक अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती दिलीय. बचावकार्यात मदत करण्यासाठी पालिकेने बोगोटा आणि मेदेलिन येथून आपत्ती प्रतिसाद पथके मागवली आहेत.

‘आतापर्यंत दोन जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे, ज्यात एक वृद्ध महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. अजूनही काही लोक अडकले आहेत,’ असे एडर यांनी ‘ब्ल्यू रेडिओ’ला सांगितले. शहरातील अनेक संवेदनशील ठिकाणी आपत्कालीन पथके कारवाई करत आहेत. चोको प्रांतातील सान जोस देल पाल्मारजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

चोको प्रांतात जीवितहानी झाल्याचे आणि मोठे नुकसान झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे, भूकंप प्रभावित भागात बचाव आणि पाहणी पथकांचे काम सुरूच आहे. नागरिकांना भूकंपाचे धक्के पुन्हा बसण्याची शक्यता लक्षात घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या दशकात देशात झालेला हा सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचे कोलंबियन जिऑलॉजिकल सर्व्हिसने म्हटले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक. ​महाबळेश्वर –प्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वर येथे येणाऱ्या

Live Cricket