नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » प्रशासकीय » महाबळेश्वरमध्ये विकासकामांना वेग; नगराध्यक्ष सुनील शिंदे यांचा थेट जनसंपर्कावर भर

महाबळेश्वरमध्ये विकासकामांना वेग; नगराध्यक्ष सुनील शिंदे यांचा थेट जनसंपर्कावर भर

महाबळेश्वरमध्ये विकासकामांना वेग; नगराध्यक्ष सुनील शिंदे यांचा थेट जनसंपर्कावर भर

अवघ्या ४ महिन्यांत महाबळेश्वरमध्ये विकासकामांचा धडाका

महाबळेश्वर (प्रतिनिधी )-महाबळेश्वर शहरात सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांची नगराध्यक्षांकडून थेट ग्राउंड झिरोवर जाऊन पाहणी केली जात असून, प्रलंबित विषयांचा धडाकेबाज आढावा घेतला जात आहे.अवघ्या चार महिन्यांच्या अल्प कालावधीतच नगराध्यक्षांनी महाबळेश्वरच्या विकासाचा आणि लोकांच्या समस्या सोडवण्याचा मोठा सपाटा लावला आहे.

नगराध्यक्ष सुनील शिंदे आणि त्यांच्या सर्व सत्ताधारी नगरसेवकांनी शहराच्या विकासात्मक कामांवर विशेष भर दिला आहे. याच अंतर्गत प्रभाग क्रमांक १ मधील रांजणवाडी येथील विविध विकासकामांची नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रभागातील स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच येथील शाळा क्रमांक ४ ची प्रत्यक्ष पाहणी करून शालेय अडचणीही समजून घेतल्या.

या सर्व समस्या अत्यंत प्राधान्याने आणि लवकरात लवकर मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी स्थानिक नागरिकांना दिले. निवडणूक संपताच अवघ्या काही महिन्यांतच प्रत्यक्ष कामाचा असा तगादा लावणाऱ्या नगराध्यक्षांच्या या धडाडीच्या आणि संवेदनशील कारभारामुळे संपूर्ण परिसरातून आणि महाबळेश्वरमधून सध्या मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.

या पाहणी दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी आणि नागरिकांशी बोलताना नगराध्यक्ष सुनील शिंदे म्हणाले की, “येत्या दिवसांत मी स्वतः शहरातील प्रत्येक प्रभागाच्या विकासकामांकडे वैयक्तिकरित्या लक्ष घालणार आहे. तिथल्या जनतेच्या प्रत्येक लहान-मोठ्या समस्या सोडवण्यासाठी आमचे प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध राहील.

ह्या आढावा दौऱ्या दरम्यान नगराध्यक्ष सुनील शिंदे, उपनगराध्यक्ष नासिर मुलानी, नगरसेवक अफझल सुतार, संजय जंगम ,संगीता वाडकर,रोहित ढेबे ,विमल पारठे ,विद्या बावळेकर,संतोष शिंदे ,पल्लवी कोंढाळकर संतोष आखाडे ,राहुल पिसाळ,प्रियांका वायदंडे ,रेश्मा ढेबे आदी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket