धावडशीत जमला बालमित्रांचा मेळा तब्बल वीस वर्षांनंतर २००४-०५ च्या बॅचचे वर्गमित्र एकत्र
सातारा, ता. १० : तब्बल २० वर्षांनंतर भेटीमुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्याचे भाव श्री ब्रह्मेंद्रस्वामी हायस्कूल धावडशीच्या २००४-०५ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमेळाव्यात पाहायला मिळाले. हा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात झाला.
स्नेहमेळाव्याची सुरुवात या वर्गातील दिवंगत मित्रांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास मुख्याध्यापिका मायावती बेलसरे, वसंत तुपे, गजानन यादव, क्षितीजा क्षीरसागर, प्रमिला कुलकर्णी हे सर्व शिक्षक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांनी सर्व उपस्थित शिक्षकांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व माजी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.
सहायक पोलिस निरीक्षक अनिता मेणकर-आमंदे यांनी महिला सबलीकरण आणि महिलांच्या सशक्तीकरण याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात सहभागी सर्वांना सन्मानचिन्ह देण्यात आले. चंद्रकांत महामुनी यांनी सूत्रसंचालन केले. योगेश शिंदे यांनी आभार मानले.
स्नेहमेळाव्यासाठी अशोक पवार, देवेंद्र चोरगे, सुनीता माने-पवार, विनीत कारंडे, सोमनाथ पवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी अमर जाधव, स्वप्नील सावंत, समीर मेणकर, सचिन सरडे, मंगेश फाळके, सागर आमंदे, नितीन लोहार, गणेश पवार, राहुल कारंडे, मंगेश अनपट, वैभव पवार, सचिन आमंदे, नीलम मर्ढेकर, प्रगती काटकर, प्रज्ञा साबळे, नीलम मोरे, सीमा जिमन, वंदना शिंगटे, सोनाली निकम, धारेश्वरी जाधव, आरती ढाणे, शैला घागरे, प्रियांका खुळे, स्वाती घागरे, नीलम यादव आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
शैक्षणिक खर्च उचलणार
तब्बल वीस वर्षांनंतर हा स्नेहमेळावा घेतल्यानंतर आपल्या शाळेतील मुलांसाठी काहीतरी करण्याच्या हेतूने २००४ – ०५ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेतील दरवर्षी एका गुणवंत विद्यार्थ्याचा शैक्षणिक खर्च हे सर्व माजी विद्यार्थी उचलणार आहेत.