Home » राज्य » पॅराग्लायडींग साहसी खेळाची जागतिक स्पर्धा घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पॅराग्लायडींग साहसी खेळाची जागतिक स्पर्धा घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पॅराग्लायडींग साहसी खेळाची जागतिक स्पर्धा घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

दि.१८ पॅराग्लायडींग या साहसी व आव्हानात्मक खेळाची जागतिक स्पर्धा घेतली जाईल या स्पर्धेसाठी शासन सर्व ती मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

टाईम महाराष्ट्र आयोजित पॅराग्लायडींग प्री वर्ल्ड कप स्पर्धा-२०२४ बक्षीस वितरण सभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई , आमदार मकरंद पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, टाईम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचेकर आदी उपस्थित होते.

पॅराग्लायडींग करणे हे साहसी व आव्हानात्मक असून जमिनीवर उतरणे तितकेच महत्त्वाचे आहे. दऱ्या खोऱ्यांनी व निसर्गसंपदेने नटलेल्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत या स्पर्धेचे चांगले आयोजन केले आहे.पॅराग्लायडींग या खेळाची जागतिक स्तरावरील स्पर्धा लवकरच महाराष्ट्रात घेतली जाईल, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या जयंती आहे या निमित्ताने जनतेला शुभेच्छा त्यांनी दिल्या.

या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात

Post Views: 33 सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी

Live Cricket