Home » ठळक बातम्या » छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार आमदार मकरंद पाटील यांना आहे का?पुरुषोत्तम जाधव यांचा वाई येथील सभेत सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार आमदार मकरंद पाटील यांना आहे का?पुरुषोत्तम जाधव यांचा वाई येथील सभेत सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार आमदार मकरंद पाटील यांना आहे का?पुरुषोत्तम जाधव यांचा वाई येथील सभेत सवाल पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारार्थ वाई व शिरवळ शहरात भव्य रॅली

वाई/ प्रतिनिधी अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधीला जर वेळच मिळत नसेल तर अशा निष्क्रिय आमदारांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा देखील अधिकार नाही.नेहमीच प्रचारात छत्रपतींचा स्मारकाचा मुद्दा घेऊन तीन टर्म आमदारकी भोगली ,आता २०२४ मध्ये पुन्हा तोच अर्धवट अवस्थेत असलेल्या स्मारकाचा मुद्दा

घेऊन वाई शहरात मते मागत आहेत.दोन गुंठ्यांत सुरू असलेल्या छत्रपतींच्या स्मारकाला पूर्ण करण्यासाठी १५वर्षे लागत असतील तर काय म्हणायचं या बिचाऱ्याला? असा सवाल अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी विद्यमान आमदारांना केला आहे. वाई व शिरवळ शहरात झालेल्या प्रचार रॅली दरम्यान ते बोलत होते.

  वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारार्थ वाई व शिरवळ शहरातून जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी वाई शहरातील मतदार बंधू भगिनी नागरिक व व्यापाऱ्यांशी पुरुषोत्तम जाधव यांनी प्रत्यक्ष भेटून संवाद साधला.

शिरवळ शहरात पुरुषोत्तम जाधव यांचे भगवे वादळ

वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांची जोरदार प्रचार रॅली काल रात्री वाई शहरात काढण्यात आली या रॅलीमध्ये हजारो युवकांचा सहभाग होता. कट्टर हिंदुत्ववादी विचाराची ओळख असलेल्या पुरुषोत्तम जाधव यांनी आज सकाळी शिरवळ शहरातून काढलेल्या या रॅलीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदवला. या प्रचारा दरम्यान वाई आणि शिरवळ शहरात भगवे वादळ पाहायला मिळाले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 20 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket