Home » देश » दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनीं 3 शब्दांतच विषय संपवला

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनीं 3 शब्दांतच विषय संपवला

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनीं 3 शब्दांतच विषय संपवला

पुणे -मागील काही दिवसांपासून जेष्ठ नेते शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याचं कारण म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे अनेकदा एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात शरद पवार यांचे खुलेपणाने कौतुक केल्याने महायुतीत पवारांना घेण्याचा संकेत मिळतोय का? अशी चर्चा देखील रंगली. मात्र, या चर्चांवर आज खुद्द शरद पवार यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली असून, आपल्या नेहमीच्या थेट शैलीत त्यांनी अवघ्या तीन शब्दांतच हा विषय संपवला “मला माहिती नाही…”, असं म्हणत शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला पूर्ण विराम दिला आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket