Home » ठळक बातम्या » आरोग्य » उत्कर्ष पतसंस्था आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

उत्कर्ष पतसंस्था आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न 

उत्कर्ष पतसंस्था आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न 

पाचवड (वार्ताहर) : रक्तदान हेच श्रेष्ठदान ही संकल्पना घेऊन वाई फेस्टिवल अंतर्गत उत्कर्ष पतसंस्थेच्या पाचवड शाखेने आयोजित केलेले रक्तदान शिबिर मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी सुमारे 125 रक्तदात्यानी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आपला सहभाग नोंदविला. 

        रक्तदान शिबिराचे उद्घाटन सहाय्यक निबंधक अनिल क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर उत्कर्ष पतसंस्थेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असल्याचेही नमूद केले. 

       या शिबिरात 125 रकतदात्यानी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला. पाचवड सारख्या विकसनशील ग्रामीण भागात अशा उपक्रमांची आवश्यकता ओळखून उत्कर्ष पतसंस्थेने आयोजित केलेले हे शिबिर म्हणजे सभासद व व्यापारी वर्गाला सामाजिक दिशादर्शक असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. 

       यावेळी पाचवड गावचे सरपंच महेश गायकवाड, तिरंगा इंग्लिश स्कूलचे सचिव जयवंत पवार, संचालक भूषण तारू, मुख्य व्यवस्थापक प्रकाश पवार, शाखा व्यवस्थापक निरंजन गोळे, साजीद मुल्ला, राजेश जगताप, बाळकृष्ण वाघ, जीवन शेवाळे,राजेंद्र इथापे, महेंद्र गायकवाड, किरण बाबर,सभासद,व्यापारी, पाचवड शाखा कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 16 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket