उद्दिष्टपूर्ती करणाऱ्या सेवकांचा सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
सातारा प्रतिनिधी -सहकार भूषण धन्वंतरी ना. सह. पतसंस्थेतर्फे आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये ठेवी संकलन, कर्ज वसुली, सभासद नोंदणी व एकंदर व्यवसाय वाढीची दिलेली सर्व उद्दिष्टे कौशल्याने व प्रामाणिकपणे पूर्ण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा “सेवक सन्मान सोहळा” शनिवार दि. 09 मे रोजी संस्थेच्या धन्वंतरी भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा. अविनाश कदम यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
प्रारंभी राष्ट्रगीत धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे व सर्व संचालक मंडळाचे वतीने करणेत आले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. संजय पवार यांनी प्रमुख पाहुणे मा. अविनाश कदम यांचा परिचय करून दिला. संस्थेचे संस्थापक चेअरमन मा. डॉ. रविंद्र भोसले यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला आणि मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थापक चेअरमन मा. डॉ. रविंद्र भोसले म्हणाले की, यावर्षी संस्थेने ₹185 कोटी ठेवी, ₹152 कोटी कर्ज, वसूल भागभाडवल ₹11 कोटी, एन. पी. ए. शून्य टक्के 15000 सभासद, ₹5 कोटीपेक्षा जास्त नफा व सी. आर. ए. आर.34% पेक्षा जास्त ही उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. एकंदर व्यवसायात गतवर्षीच्या तुलनेत रु.66 कोटींची वाढ झाली आहे. व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे म्हणाले की, धन्वंतरी पतसंस्थेचा सेवक वर्ग प्रामाणिक व कष्टाळू आहे. पतसंस्थेच्या प्रगतीसाठी ठेवी संकलन, कर्जवाटप, कर्ज वसुली, सभासद वाढ व एकंदर व्यवसाय वृद्धी या सर्व घटकात त्यांना दिलेली उद्दिष्टे १००% पूर्ण करून संस्थेचा नावलौकिक वाढविलेबद्दल धन्वंतरी टीमचे अभिनंदन करून पुढीलवर्षी यापेक्षाही उल्लेखनीय कामगिरी करणेसाठी पुढील वाटचालीस डॉ. रविंद्र भोसले आणि डॉ. कांत फडतरे शुभेच्छा दिल्या.
सन 2026-27 मध्ये रु.500 कोटीचा एकत्रित व्यवसायाचे उद्दिष्ट गाठून नवा विक्रम करणेसाठी सज्ज होऊया असे मा. व्हा. चेअरमन यांनी आवाहन करून सर्व स्टाफचे कौतुक केले. “ग्राहकसेवा व टीमवर्कमुळेच हा विक्रम शक्य झाला” असे ते म्हणाले. तसेच यावर्षी शून्य टक्के एन. पी. ए. चे उद्दिष्ट साध्य झाल्याबद्दल सर्व सेवकांचे कौतुक केले. याप्रसंगी सर्वोत्कृष्ट शाखा म्हणून प्रथम क्रमांक- सातारा शाखा, द्वितीय क्रमांक- फलटण शाखा आणि तृतीय क्रमांक धनकवडी शाखा यांना सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करणेत आले.
सर्वोत्कृष्ट वसुलीबद्दल वसूली विभागातील अधिकारी श्री. शंकरराव चव्हाण आणि टीम यांचा रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करणेत आला, प्रशासन विभाग आणि टीम- श्री. शहानवाज मुल्ला यांना तसेच अंतर्गत लेखापरीक्षण विभाग आणि टीम म्हणून श्री. मंगेश शेवडे तसेच कर्ज छाननी व व्यवसयवाढ विभाग आणि टीम सौ. रूपाली शिंदे व CBS विभाग व टिम- श्री. सचिन शिंदे यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सर्वाधिक ठेव संकलनासाठी श्री राजेंद्र नलावडे- कोरेगाव शाखा, पराग बोडस व अभिमन्यु गुरव सातारा शाखा यांना, तर वसुलीकरीता विजय शिर्के-पिंपरी चिंचवड शाखा, उमेश बडे, अमर गोळे-सातारा शाखा, सभासद वाढीकरिता – प्रमोद इंगवले-सदर बझार शाखा, अर्जुन नांगरे- कराड शाखा, सुमित तांबे – धनकवडी शाखा यांना, आणि कर्जवाटपाकरिता – संतोष शिंगटे – फलटण शाखा, सुमित तांबे – धनकवडी शाखा आणि शशांक निकम फलटण शाखा यांना तसेच उत्कृष्ट सेवक म्हणून सौ. सुषमा पवार, समीर गोरूले, किशोर बाबर, सौ. सारिका जाधव, देवेंद्र यादव, वैभव शेंडे, सौ दीपाली जाधव, सौ. शीतल शिंदे, नवनाथ भोसले, तर उत्कृष्ट शिपाई म्हणून सागर बागडे, सुरज भिंगारे, संजय यादव या सर्वाना सन्मानचिन्ह, व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कर्ज छाननी व व्यवसाय वाढ आणि टीम तर्फे सौ रुपाली शिंदे तसेच सीबीएस विभाग व टीम तर्फे श्री सचिन शिंदे यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात सातारा जिल्हा सह. पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा. अविनाश कदम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, आणि पुढील उद्दिष्टे पूर्ण करणेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी नेटविन सॉफ्टवेअर, पुणे चे श्री. शिवाजी कोंडेकर याचाही सत्कार सन्मानचिन्ह देऊन संस्थेचे व्हा. मा.डॉ. कांत फडतरे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार यांनी केले.
आभारप्रदर्शन संस्थेचे व्हा. चेअरमन मा. डॉ. कांत फडतरे यांनी केले. या कार्यक्रमास संचालक डॉ. अरविंद काळे , डॉ. शिरीष भोईटे, डॉ. शकिल आतार, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. अभिजीत भोसले, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. जयदीप चव्हाण, डॉ. सौ. सारिका मस्कर, डॉ. सौ. हर्षला बाबर, डॉ. नारायण तांबे, डॉ सुनिल कोडगुले, श्री सूर्यकांत देशमुख आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते. सन्मान सोहळ्यानंतर नेटविन सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण सर्व स्टाफला देणेत आले. हा कार्यक्रम यशस्वी होणेसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहरी डिंगणे, सहा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अलका मुरूमकर आणि पदाधकारी यांनी मेहनत घेतली.




