Home » ठळक बातम्या » भोसे येते आमदार मकरंद आबा पाटील यांच्या फंडातून ३ कोटी १२ लाखांचा निधी मंजूर ; राजेंद्र शेठ राजपुरे यांचे हस्ते भूमिपूजन

भोसे येते आमदार मकरंद आबा पाटील यांच्या फंडातून ३ कोटी १२ लाखांचा निधी मंजूर ; राजेंद्र शेठ राजपुरे यांचे हस्ते भूमिपूजन 

भोसेला आमदार मकरंद आबा पाटील यांच्या फंडातून ३ कोटी १२ लाखांचा निधी मंजूर ; राजेंद्र शेठ राजपुरे यांचे हस्ते भूमिपूजन 

पांचगणी : महाबळेश्वर तालुक्याच्या विकासासाठी आमदार मकरंद आबा पाटील यांनी भरघोस निधी दिला असून भोसे गावातील विविध विकास कामांसाठी आमदार फंडातून तब्बल ३ कोटी १२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांचे भूमिपूजन आज जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांचे हस्ते झाले. 

 

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी अथक परिश्रम घेऊन पाठपुरावा करीत. भोसे गावासाठी विविध योजनांच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त केला आहे. यामध्ये आमदार फंडा मधून मंजूर झालेल्या जलजीवन नळ पाणी पुरवठा आणि पाण्याची टाकी ४१ लाख , झोळी आणि परिसर खडी व डांबरीकरण १० लाख, नवीन गावठाण काँक्रीटीकरण व डांबरीकरण ४५ लाख, स्मशानभूमी खडीकरण व सुशोभीकरण ५ लाख, जिल्हा परिषद शाळा पाठीमागे संरक्षण भिंत व लॅ स्लायडिंग प्रणव क्षेत्रातील उपाययोजना करणे १.९६ कोटी रुपये, अंगणवाडी इमारत १५ लाख असे एकूण ३ कोटी १२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

या सर्व कामाचा शुभारंभ आज जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जावळी बाजार समिती संचालक गुलाब गोळे, सरपंच अरुण गोळे, सदस्य सविता गोळे, किरण पवार, पोलीस पाटील रुपाली गोळे , ग्रामविकास अधिकारी मोनिका बाबर, मिलिंद बक्षी, सुरेंद्र भिलारे, बबन दांनवले, जितेंद्र दानवले, विजय गोळे, राम गोळे, विशाल गोळे, गणेश गोळे, मधुकर गोळे, आनंद गोळे, नारायण भोज व ग्रामस्थ उपस्थित होते. 

सरपंच अरुण गोळे यांच्या हस्ते राजेंद्र शेठ राजपुरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना राजेंद्र शेठ राजपुरे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महाबळेश्वर तालुक्यात काम करताना मकरंद आबा पाटील यांनी भोसे गावच्या. विकासावर विशेष लक्ष आहे. त्यामुळे भरघोस निधी त्यांनी गावाला दिला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी. भविष्यकाळात त्यांच्या पाठीशी कायम राहू असे सांगितले.  

आमदार मकरंद आबा पाटील यांच्या निधीतून आणि राजेंद्र शेठ यांच्या पाठपुराव्याने भोसे गावाला भरघोस निधी दिला आहे. राजूशेठ तुम्हाला आम्ही सर्व ग्रामस्थ आज खात्री देतो मकरंद आबा पाटील यांच्या पाठीमागे आमचे गाव पूर्णपणे पाठीशी राहील असा विश्वास यावेळी सरपंच अरुण गोळे यांनी व्यक्त केला. गुलाब गोळे यांनी सूत्रसंचालन केले. तर विशाल गोळे यांनी आभार मानले. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket