भारत विकास परिषद शाखा वाई, सामाजिक उपक्रम
वाई प्रतिनिधी -भारत विकास परिषद शाखा वाई यांच्यातर्फे वाई तालुक्यातील गरजू विधवा अशा दुर्गम भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना पावसाळ्यासाठी मोफत छत्री वाटप करण्यात आल्या. भारत विकास परिषद शाखा वाई सामाजिक उपक्रमात अग्रेसर असून श्री शशि कोचळे यांनी या 10 अंगणवाडी सेविकांची निवड केली. प्रवीण ओसवाल हे भारत विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत श्री बोपर्डीकर यांनी पूर्ण कार्यक्रमाचे संचालन निवेदन केले श्री शशी कोचळे यांनी सर्वांचे आभार मानले. यानंतर सगळ्या अंगणवाडी सेविका आणि भारत विकास परिषदेचे सदस्य यांच्यासाठी चहापानाचा प्रोग्राम होता.
अंगणवाडी सेविका यांनी त्यांचे मनोगत ते काय काय काम करतात दुर्गम भागात जाऊन डोंगराळ भागात जाऊन महिलांसाठी मुलींसाठी कार्य करित असतात हे त्यांनी सगळ्यांना सांगितले त्यांना छत्री मिळाल्यावर खूप आनंद झाला. यावेळी कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्यां तनिषा पोरे व मान्यवरांची उपस्थिती होती. भारत विकास शाखा परिषदेअंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबवली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
