Home » देश » धार्मिक » भरत पाटील यांचा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने सत्कार

भरत पाटील यांचा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने सत्कार 

भरत पाटील यांचा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने सत्कार 

 मांढरदेव प्रतिनिधी -सातारा जिल्हा ॲम्युचर ॲथलेटिक असोसिएशन चे सामना समिती अध्यक्ष मा.श्री भरत पाटील यांची भारत सरकारच्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या संचालकपदी “मिनिस्ट्री ऑफ स्टील”भारत सरकार(राज्यमंत्री दर्जा)नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल जिल्हा संघटनेच्या वतीने आज त्यांचा हॉटेल अलंकार,कराड येथे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री पांडुरंग शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय खेळाडू व संघटक श्री संजय वाटेगावकर तसेच इतर पदाधिकारी सदस्य श्री दिलीप चिंचकर, श्री राजगुरू कोचळे, श्री सचिन काळे, सभासद श्री महेंद्र भोसले, निरंजन साळुंखे इ उपस्थितीत होते.भरत पाटील हे जिल्ह्याचे उत्कृष्ट ॲथलेटिक्स खेळाडू होते तसेच गेल्या काही वर्षापासून जिल्हा संघटनेच्या सामना समिती अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक खेळाडूंना व जिल्हा स्पर्धा आयोजनात विविध प्रकारे मदत केलेली आहे, त्यांची निवड झाल्याने जिल्ह्यातील खेळाडू प्रशिक्षक व पालक यांनी आनंद व्यक्त केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Post Views: 248 महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५

Live Cricket