Home » गुन्हा » बांगलादेशी पॉर्न स्टारला उल्हासनगरमधून अटक; रिया बर्डे नावानं सहकुटुंब करत होती वास्तव्य!

बांगलादेशी पॉर्न स्टारला उल्हासनगरमधून अटक; रिया बर्डे नावानं सहकुटुंब करत होती वास्तव्य!

बांगलादेशी पॉर्न स्टारला उल्हासनगरमधून अटक; रिया बर्डे नावानं सहकुटुंब करत होती वास्तव्य!

भारतात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत आहे. मात्र, त्यावर अद्याप कायमस्वरूपी तोडगा काढण्यात राजकारणी व सत्ताधाऱ्यांना अपयश आलं आहे. त्यामुळे वेळोवेळी ठिकठिकाणी अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना ताब्यात घेतल्याच्या बातम्या समोर येत असतात. आता मुंबई उपनगरांपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या उल्हासनगरमधून पोलिसांनी चक्क एका बांगलादेशी पॉर्नस्टारला अटक केली आहे. विशेष म्हणजे, या पॉर्नस्टारचं आख्खं कुटुंबच बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतामध्ये राहत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर पॉर्नस्टार उल्हासनगरमध्ये रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे या मराठी नावाने राहात होती. उल्हासनगरमधील हिल लाईन पोलिसांनी तिला बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य केल्याच्या आरोपांखाली अटक केली आहे. रिया, तिची आई, तिचा भाऊ आणि तिची बहीण अशा सगळ्यांनीच खोट्या कागदपत्रांच्या मदतीने भारतीय नागरिकत्व मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात रियाची आई व वडिल हे दोघेही सध्या कतारमध्ये वास्तव्यास असल्याचं स्पष्ट झालं आहे. रिया इथे तिची बहीण आणि भावासोबत राहत होती. पोलिसांनी रियाला ताब्यात घेतलं असून तिची बहीण व भावाचा शोध चालू आहे. रियाला याआधीही वेश्याव्यवसाय प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती, असंही आता समोर आलं आहे.रियाच्याच एका मित्रामुळे त्यांचं सगळं पितळ उघडं पडलं. प्रशांत मिश्रा नावाचा रियाचा मित्र या सगळ्यासाठी कारणीभूत ठरला. प्रशांत मिश्राला अचानक एक दिवशी रिया बांगलादेशची रहिवासी असून भारतात बैकायदेशीररीत्या राहात असल्याचं समजलं. त्यानंतर त्यानं पोलिसांत तक्रार केली व पोलिसांनी लागलीच रियाची कागदपत्रं तपासून कारवाई सुरू केली.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न. 

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.  उत्कर्ष पतसंस्था आयोजित “उत्कर्षाच्या

Live Cricket