महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर! पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे हा सातारा जिल्हयातुन २ वर्षाकरीता तडीपार 
Home » ठळक बातम्या » बळीराजाला दिलासा- शेतकऱ्यांचे चोरीला गेलेले १० शेतीपंप चोरी करणाऱ्या टोळीचा रहिमतपूर पोलिसांकडून पर्दाफाश ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

बळीराजाला दिलासा- शेतकऱ्यांचे चोरीला गेलेले १० शेतीपंप चोरी करणाऱ्या टोळीचा रहिमतपूर पोलिसांकडून पर्दाफाश ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

बळीराजाला दिलासा- शेतकऱ्यांचे चोरीला गेलेले १० शेतीपंप चोरी करणाऱ्या टोळीचा रहिमतपूर पोलिसांकडून पर्दाफाश ८ लाखांचा मुद्देमाल जप्त.

सातारा -रहिमतपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तारगाव आणि नलावडेवाडी शिवारातून आरफळ डावा कालवा यावर बसविलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठीच्या १० शेती पंप (विद्युत मोटर) चोरीला गेल्याबाबत रहिमतपुर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३३/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने व कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याने तो उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. वाढत्या ऊष्णतेत पिकांना पाणी देण्याचे कालावधीतच तारगांव व नलावडेवाडी भागातुन एकाच रात्री १० शेती पंप चोरीला गेल्यामुळे गांवातील बळीराजा हवालदिल झाले होते. त्यामुळे मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा यांनी अज्ञात चारेटयांचा व चोरीस गेले मालाचा शोध तपास घेण्याबाबत प्रभारी अधिकारी रहिमतपुर योग्य त्या सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे श्री. विनोद नेवसे, सहा. पोलीस निरीक्षक, रहिमतुपर पोलीस ठाणे यांनी सदर गुन्हयातील चोरीस गेले मालाचा व अज्ञात चोरटयाचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार करुन त्यांना योग्या त्या सुचना दिल्या. पथकाव्दारे सदर गुन्ह्याचा तपास सुरु असताना पोलीस पथकाने प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे कौशल्यपूर्ण तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणुन सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपींत यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन गुन्हयातील नमुद चोरीला गेलेल्या १० शेतीपंप विद्युत मोटरी आणि त्या घेवुन जाण्याकरीता वापरलेली १ महिंद्रा पिकअप गाडी असा एकूण ८,००,०००/- (आठ लाख) रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयामध्ये १ आरोपी (वय २५ वर्षे) आणि ३ विधीसंघर्षित बालक असे एकुण ४ जणांचा समावेश आहे. तपासादरम्याने त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेले व जप्त करण्यात आलेले शेतीपंप हे बळीराजा याचे शेतीचे नुकसाना होवुन नये याकरीता तात्काळ त्यांचे ताब्यात देण्यात आल्या आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.हे.कॉ/जोतिराम भुजबळ हे करत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. तुषार दोषी, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती, राजश्री तेरणी यांचे मार्गदर्शनाखाली रहिमतपुर पोलीस ठाणे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक, श्री. विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक, श्री. गंगाप्रसाद केंद्रे, श्री. विष्णु खुडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जोतिराम भुजबळ, शंकर घाडगे, प्रविण बर्गे, तुषार काळंगे यांचे पथकाने सहभाग घेवुन सदरची कारवाई केलेली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त खवले मांजराचे खवले तस्करी प्रकरणी वनविभागाची धडक

Live Cricket