Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » माैजे साकुर्डी येथे गणेशोत्सावानिमित्त बाल हनुमान गणेश मंडळाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

माैजे साकुर्डी येथे गणेशोत्सावानिमित्त बाल हनुमान गणेश मंडळाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

माैजे साकुर्डी येथे गणेशोत्सावानिमित्त बाल हनुमान गणेश मंडळाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

कराड – समाज एकत्रित यावा, एकजूठ वाढावी आणि समाजातील गोरगरीब, दीनदुबळ्यांना मदत व्हावी. यासाठीच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सव सुरू केला. आजही तोच विचार घेवून तरूण सार्वजनिक मंडळे आरोग्य शिबिरे राबवत आहेत. लोकांच्या आरोग्यासाठी मोफत प्रचार, प्रसार करण्यासोबत उपचार देत आहात ही काैतुकास्पद बाब आहे. गणेशोत्सव सामाजिक बांधिलकीतून साजरा केला जावा असे आवाहन कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी केले. 

माैजे साकुर्डी येथे गणेशोत्सावानिमित्त बाल हनुमान गणेश मंडळाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. के. एन. गुजर मेमोरियल हाॅस्पीटल कराड यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सरपंच अॅड. विश्वासराव निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुपने प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ. अमित ठिगळे, डाॅ. प्राजक्ता वठारे, डाॅ. भुजंगराव पाटील, डाॅ. सचिन पाटील, डाॅ. एस. वाय. पाटील, डाॅ. विद्या कांबळे, डाॅ. अशितोष नांगरे, अभिषेक चव्हाण, संजय साठे, पीएसआय श्री. महाडिक, गणेश वेदपाठक, श्री. राजगे, मदनराव जाधव, निवासराव शिंदे, हणमंत डोंगरे, मसुनाथ रसाळ, शशिकांत मदने, मंडळाचे अध्यक्ष अशोक डोंगरे, शशिकांत सुर्वे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुहास पाटील, विशाल डोंगरे, सतिश निकम- पाटील, रमेश पाटील आदी उपस्थित होते.

सरपंच अॅड. विश्वासराव निकम म्हणाले, बाल हनुमान गणेश मंडळ दरवर्षा लोकांच्या आरोग्यासाठी राबवत असलेला उपक्रम काैतुकास्पद आहे. लोकांना कोरोनापासून आरोग्याची काळजी घेण्याची सवय लागली आहे. परंतु, महागाईमुळे अनेकजण दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करतो. अशावेळी सामाजिक संस्था, गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पुढाकार घेवून अशी मोफत आरोग्य शिबिरे राबविणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. विकास पाटील यांनी केले. आभार राहूल पाटील यांनी मानले. 

साकुर्डी – बाल हनुमान गणेश मंडळाच्या मोफत आरोग्य शिबिराचे उदघाटन पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, डाॅ. अमित ठिगळे, गणेश वेदपाठक, सरपंच विश्वासराव निकम यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 10 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket