महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर! पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे हा सातारा जिल्हयातुन २ वर्षाकरीता तडीपार 
Home » ठळक बातम्या » आश्रमशाळेतील शिक्षक भरतीची जाहिरात रद्द

आश्रमशाळेतील शिक्षक भरतीची जाहिरात रद्द

आश्रमशाळेतील शिक्षक भरतीची जाहिरात रद्द

सातारा  : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सातारा जिल्ह्यात अनुदानित तत्त्वावर स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा ३३ आश्रमशाळा कार्यरत आहेत. या आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन शासनामार्फत दिले जाते. त्यामुळे आश्रमशाळांच्या मान्यता व पदभरतीबाबतचे सर्व अधिकार शासनाकडे राखीव असून भरतीसाठी शासनाची अधिकृत परवानगी आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, सदगुरु जंगली महाराज शिक्षण संस्था इस्लामपूर (ता. वाळवा) या संस्थेने सदगुरु प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा शेरे (ता. कराड) येथे शिक्षक पदभरतीसंदर्भात दि. २५ मार्च २०२६ रोजी दैनिक पुढारी या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र ही जाहिरात शासनाची अधिकृत परवानगी न घेता देण्यात आल्याने ती नियमबाह्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Pavitra Portal (पवित्र पोर्टल) द्वारेच शिक्षक भरती करणे शासन निर्णय दि. ३ डिसेंबर २०२५ नुसार बंधनकारक आहे. पवित्र प्रणालीव्दारे भरती न करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना संबंधित रिक्त पदाचे वेतन अथवा वेतनेतर अनुदान देण्यात येणार नाही, अशीही तरतूद शासनाने केली आहे.

त्यामुळे दि. २५ मार्च २०२६ रोजी किंवा त्या कालावधीत प्रसिद्ध झालेली सदर शिक्षक भरतीची जाहिरात रद्द समजावी, असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सातारा येथील सुजीत बर्गे यांनी जाहीर प्रकटणाद्वारे केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त खवले मांजराचे खवले तस्करी प्रकरणी वनविभागाची धडक

Live Cricket