शिक्षिकेच्या मनमानी कारभारला कंटाळुन भिरडाच्यावाडीत सरपंच अध्यक्ष व सदस्य व ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे
वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)-भिरडाचीवाडी भुईज ता.वाई येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे.या शाळेत काही सदन आणी गोरगरिबांनी गावची शाळा म्हणुन आपली मुले शिक्षणा साठी घातली आहेत.पण दुर्दैवाने येथे नेमलेल्या शिक्षिका सौ.निता किर्वे यांच्या कडुन विद्यार्थ्यांना सतत होत असलेली मारहाण याचा जाब विचारण्यासाठी अनेक पालक शाळेत जातात त्यांच्याही या शिक्षिका अतिशय उध्दट वर्तन करतात याची तक्रार मुख्याध्यापकांना ग्रामस्थांनी केली . मुख्याध्यापकांनी संमधीत शिक्षिकेला असे वर्तन करणे चांगले नाही असे समजावण्याचा खुप प्रयत्न केला पण या महिला शिक्षिकेने तक्रारदार ग्रामस्थांन समोरच मुख्याध्यापकांचा एकेरी भाषा वापरून पानउतारा केला .त्या नंतर याची तक्रार शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल दगडे सरपंच विजय वेळे यांच्या कडे करण्यात आली .या दोघांनी घडलेल्या गंभीर घटनांची सविस्तर माहिती घेतली.हि माहिती वाई पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांना दुरध्वनी द्वारे कळवुन संबधीत शिक्षकेची तात्काळ बदली करण्याची या वेळी मागणी करण्यात आली.
गटशिक्षणाधिकारी यांनी भिरडाचीवाडी शाळेत घडत असलेल्या या गंभीर घटनांन कडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने या उद्धट शिक्षिकेला अधिक बळच मिळाल्याने त्यांच्या उध्दट वर्तना मध्ये कमालीची वाढ झाल्याचे विद्यार्थ्यांच्या पालकांना पहावयास मिळाले.या महिला शिक्षिका दररोज विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याने विद्यार्थी मारहाणीच्या भिंती पोटी दुसऱ्या शिक्षकांच्या वर्गात जाऊन बसतात . त्याही शिक्षकांना तुम्ही माझे विद्यार्थी का बसवुन घेता म्हणुन दमदाटी करत असते .
अखेर हा सर्व गंभीर प्रकार थांबविण्यासाठी व शाळेची विद्यार्थी संख्या टिकविण्या साठी व विद्यार्थी आहेत म्हणुन आपल्याला पगार मिळतो त्यामुळे आपला प्रपंच चालतो याचे भान विसरलेल्या शिक्षिका निता किर्वे या़ची दंडेलशाही मोडीत काढण्या साठी गावचे सरपंच विजय वेळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल दगडे ग्रामपंचायतीचे व शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामस्थांनी एकत्रीत येवुन निवेदन तयार करून त्यावर सर्वांच्या सह्या घेऊन हे निवेदन सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिकचे जिल्हा शिक्षणाधिकारी व वाई पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले होते. या निवेदनात म्हटले आहे की दि. २० जानेवारी पर्यंत उध्दट वर्तन करणाऱ्या महिला शिक्षिका सौ.निता किर्वे यांची तटका फडकी बदली न केल्यास आम्ही शाळेला टाळे ठोकणार आहे असा इशारा देण्यात आला होता.
पण दुर्दैवाने या निवेदनाला वाईच्या गटक्षिणाधिकार्यांनी केराची टोपली दाखविल्याने संतापलेल्या गाव कारभारी तसेच ग्रामस्थांनी एकत्रीत येवुन टाळे ठोकुन शाळा बंद ठेवली आहे .या गंभीर प्रकाराकडे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आणी वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लक्ष देतील का असा संतप्त सवाल भिरडाचीवाडी ग्रामस्थांनी विचारला आहे .
महिला शिक्षिकेची दोन दिवसात बदली न झाल्यास 26 जानेवारी रोजी वाईच्या पंचायत समिती समोर ग्रामस्थ व महिला उपोषण करणार आहेत.भुईज चे सरपंच विजय वेळे, सोसायटीचे उपाध्यक्ष नारायण दुरगुडे,सदस्य रमेश दगडे यांच्यासह महिलांनी दिला आहे.
