Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पांचगणीत नव्या नेतृत्वाची घोषणा – सुनिल बगाडे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात

पांचगणीत नव्या नेतृत्वाची घोषणा – सुनिल बगाडे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात

पांचगणीत नव्या नेतृत्वाची घोषणा – सुनिल बगाडे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात

पांचगणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मा. श्री. सुनिल शरद बगाडे यांची समाजाच्या वतीने पांचगणी नगराध्यक्ष पदासाठी एकमताने उमेदवारी जाहीर करण्यात आली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलनी येथील समाज मंदिरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.सुनिल बगाडे हे उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमा असलेले आणि सामाजिक कार्यात सक्रीय व्यक्तिमत्व आहे. ते सध्या पांचगणी रोटरी क्लबचे स्पोर्ट डायरेक्टर म्हणून तीन वर्षांपासून कार्यरत असून, लववीर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष देखील आहेत.

बगाडे म्हणाले, “पांचगणीचा विकास केवळ रस्ते, गटर, वीज यापुरता मर्यादित राहता कामा नये. पर्यटन, रोजगार, उच्च शिक्षण व सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शहराचा दीर्घकालीन विकास साधण्यासाठी मी समाजाच्या पाठिंब्यावर निवडणुकीत उतरण्याचा निर्धार केला आहे.”

बैठकीला सामाजिक कार्यकर्ते अरुण घाडगे, रुपेश बगाडे, सचिन बगाडे, सचिन तांबे, विकी बगाडे, प्रकाश गोरे (गुरुजी), गौतम कांबळे, अशोक कदम, रुपेश सपकाळ, नितीन घाडगे आदी उपस्थित होते.अखेर श्री. अशोक कदम यांनी सर्व समाजाचे आभार मानत सुनिल बगाडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

Post Views: 63 नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन सातारा-भारत

Live Cricket