संधीचं सोनं करणार माण खटावमध्ये विजयाची तुतारी वाजवून दाखविणार -अनिल देसाई
सातारा : माण विधानसभा मतदारसंघातून प्रमुख दावेदार असणारे, जिल्हा बँकेचे संचालक अनिलभाऊ देसाई यांनी बारामती मधील गोविंदबाग येथे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष मा.श्री. शरद पवार साहेब यांची भेट घेतली. यावेळी त्यानीं माण खटाव विधानसभा मतदार संघातून उमेदवारीची मागणी केली. पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या परिवर्तनवादी विचारधारेचा वसा आणि साहेबांचा आशीर्वाद असला तर माण खटाव तालुक्यात विजयाची तुतारी निनादेल असा विश्वास दिला. मला संधी मिळाली तर मी माण खटाव राष्ट्रवादीमय करून दाखविण्याचा निर्धार त्यावेळी त्यानीं व्यक्त केला.यावेळी अनिल देसाई यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.माण खटाव विधानसभा मतदारसंघांमध्ये अनिल देसाई यांना मानणारा प्रचंड मोठा मतदार असून शरदचंद्र राष्ट्रवादी पक्षातून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
अनिल देसाई यांच्या आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या भेटीने मान खटाव विधानसभा मतदारसंघांमध्ये खळबळ माजली आहे. अनिल देसाई यांना युवकांचा प्रचंड पाठिंबा असून माण खटाव विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी विकास कामेही केली आहेत.