Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » अनपटवाडीच्या सरपंच रुपाली मुळीक यांचे सरपंच पद कायम विरोधकांना सणसणीत चपराक

अनपटवाडीच्या सरपंच रुपाली मुळीक यांचे सरपंच पद कायम विरोधकांना सणसणीत चपराक

अनपटवाडीच्या सरपंच रुपाली मुळीक यांचे सरपंच पद कायम विरोधकांना सणसणीत चपराक

पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडून सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय रद्द

सातारा दि.अनपटवाडी ता.कोरेगावच्या सरपंच रुपाली प्रशांत मुळीक यांच्या सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या ग्रामपंचायत सदस्य पद अपात्रचा निर्णय पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी रद्द केला असून द्विवेदी यांनी दिलेल्या निर्णयामुळे तक्रारदार मनोज मधुकर अनपट यांना न्यायालयाने चांगलीच चपराक दिल्याची चर्चा कोरेगाव तालुक्यात रंगली आहे.

या बाबतचे सविस्तर वृत्त असे की अनपटवाडी ता.कोरेगावच्या सरपंच रुपाली प्रशांत मुळीक यांच्या विरोधात अनपटवाडीचे माजी सरपंच मनोज मधुकर अनपट यांनी रुपाली मुळीक सरपंच असून देखील त्यांनी ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण केल्याने मुळीक यांचे ग्रामपंचायत सदस्यपद आणि सरपंचपद अपात्र घोषित करावे अशी लेखी तक्रार जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केली होती.या तक्रारीवरून जिल्हाधिकारी सातारा यांनी दि.13.07.20230 रोजी रुपाली मुळीक यांचे सदस्यपद अपात्र म्हणून निर्णय दिलेला होता.सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाला अनपटवाडीच्या सरपंच रुपाली मुळीक यांनी पुणे येथील अतिरिक्त उप विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांचेकडे अपील केले होते.

सरपंच रुपाली मुळीक यांच्या अपिलावर निर्णय देताना पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी त्यांच्या निर्णयात सरपंच रुपाली मुळीक यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर कसलेही अतिक्रमण केलेले नसून,अतिक्रमण म्हणून सांगितलेली जागा ही रुपाली मुळीक यांचे सासरे प्रकाश मुळीक यांच्या खाजगी मालकीची आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण झाले आहे हे सिद्धच होऊ शकत नाही.त्यामुळेच जिल्हाधिकारी सातारा यांनी सरपंच रुपाली प्रशांत मुळीक यांचे ग्रामपंचायत सदस्यपदी अपात्र असा दिलेला निर्णय रद्द करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिला.

या निर्णयानंतर सरपंच रुपाली मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून,फटाके वाजऊन एकच जल्लोष केला.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सरपंच रुपाली मुळीक म्हणाल्या की अनपटवाडी गावचा सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारताच आम्ही सर्वांना एकत्र घेऊन गावचा सर्वांगीण विकास केल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली.त्यामुळेच आकस बुध्दीने,सुड भावना मनात ठेऊन,एका प्रामाणिक महिला सरपंचांना प्रत्त्येक ठिकाणी विरोध करून आम्हाला संपविण्याचे वेळोवेळी षडयंत्र रचले होते.परंतु आमचा न्यायदेवतेवर विश्वास होता आणि आहे.पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी आमच्या बाजूने निकाल देऊन विरोधकांना त्यांनी जागा दाखवली आहे.आणि एक चांगली चपराक लावली आहे.आता तरी अनपटवाडी गावच्या विकासासाठी विरोधकांनी शहाणे होऊन विकासात आडकाठी घालू नये अन्यथा विरोधकांना जनताच धडा शिकवेल असा निर्वाणीचा इशारा सरपंच रुपाली मुळीक यांनी मनोज अनपट यांना दिला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दोनवेळा पडलेला समोरचा माणूस पैशाच्या जोरावर एवढ्या उड्या मारतोच कसा? दोन-तीन वेळा पडून सुद्धा एवढा पैसा येतो कुठून?-सुषमा अंधारे

दोनवेळा पडलेला समोरचा माणूस पैशाच्या जोरावर एवढ्या उड्या मारतोच कसा? दोन-तीन वेळा पडून सुद्धा एवढा पैसा येतो कुठून?-सुषमा अंधारे कराड

Live Cricket