अमेरिकेकडून भारतावर 26 टक्के टॅरिफ
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर 34 टक्के आणि युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 20 टक्के नवीन आयातशुल्क लागू केले आहे. त्यांनी भारतावर 26 टक्के आयात शुल्क जाहीर केला.पंतप्रधान मोदींशी नुकतीच भेट झाली आहे आणि ते माझे चांगले मित्र आहेत, परंतु भारत आम्हाला योग्य वागणूक देत नाही. ते आमच्याकडून ५२ टक्के शुल्क आकारतात आणि आम्ही त्यांच्याकडून जवळजवळ काहीही आकारत नाही,” असे त्यांनी रोज गार्डनमधील “मेक अमेरिकन वेल्थी अगेन” कार्यक्रमात भाषणात ट्रम्प यांनी म्हटले होते.
२०२४ मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार एकूण १२४ अब्ज डॉलर्स होता. भारताची अमेरिकेला होणारी निर्यात ८१ अब्ज डॉलर्सवर पोहोचली, तर अमेरिकेतून होणारी आयात ४४ अब्ज डॉलर्स होती, ज्यामुळे भारताला ३७ अब्ज डॉलर्सचा व्यापार अधिशेष मिळाला.
