भिलार येथील हिलरेंज विद्यालयात साकारली प्रतापगड किल्ल्याची अप्रतिम प्रतिकृती
पांचगणी -हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलार, तालुका महाबळेश्वर, या शाळेतील शिक्षक श्री. कल्पेश गायकवाड आणि त्यांचे उत्साही विद्यार्थी श्रवण गोळे, पार्थ कांबळे, राज शिंदे, सुजल पिंगळे व इतर विद्यार्थी यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देत प्रतापगड किल्ल्याची एक अप्रतिम आणि कल्पक प्रतिकृती विद्यालयात साकारली आहे,
भिलार येथील हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या हिलरेंज माध्यमिक विद्यालयात हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, सचिव जतीन भिलारे , संचालिका डॉ तेजस्विनी भिलारे , मुख्याध्यापक मुकुंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रतिकृती सादर केली.विद्यार्थ्यांना कल्पेश गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.ही कलाकृती नाही, तर ते आपल्या समृद्ध इतिहासाप्रती असलेले प्रेम, आदर आणि समर्पण दर्शवते. प्रतापगडाची प्रतिकृती निर्माण करताना तुम्ही घेतलेले कष्ट, वापरलेली कल्पकता आणि सांघिक वृत्ती खरोखरच कौतुकास्पद आहे. यातून तुम्ही केवळ एक किल्लाच उभा केला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि दूरदृष्टीची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केले आहे.असे प्रतिपादन हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे यांनी केले
या साठी शांताराम जाधव, विनायक बगाडे, राजू मोरे , संगीता खरात, सुजाता पारठे, योगिता रांजणे यांचे सहकार्य लाभले.




