अजिंक्य पिसाळने गौरीशंकरच्या सुखात्मे स्कूलचा नावलौकिक उंचविला – श्रीरंग काटेकर.
एन.ङी.ए मध्ये माजी विद्यार्थ्यांची निवड. शुभेच्छाचा वर्षाव.
लिंब – देशसेवेसाठी लढण्याची तीव्र इच्छा आणि लढाऊ विमानाचे नेतृत्व करण्याची जिद्द मनात ठेवून वाटचाल करणाऱ्या गौरीशंकरच्या डॉ. पी. व्ही. सुखात्मे स्कूल लिंब येथील माजी विद्यार्थी यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर भारतीय वायुसेनेत फ्लाईंग ऑफिसर पदापर्यंत मजल मारली असून त्याने स्कूलचा नावलौकिक उंचविला आहे असे मत गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले आहे ते लिंब ता.जि. सातारा येथील गौरीशंकरच्या शैक्षणिक संकुलात आयोजित केलेल्या सत्कार समारंभात प्रसंगी ते बोलत होते यावेळी स्कूलचे प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण ,अमित मडके , कृतिका साळुंखे, राकेश खोपडे, नितीन शिवथरे आदी प्रमुख उपस्थित होते.
श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की मनामध्ये प्रबळ इच्छाशक्ती असेल तर जीवनात अशक्य काहीच नाही हे अजिंक्य पिसाळने सिद्ध केले आहे.
प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण म्हणाले की ध्येय निश्चितीचा ध्यास घेऊन वाटचाल करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला यश हे निश्चित मिळते त्यासाठी प्रयत्नांची परकष्ठा करण्याची नितांत गरज आहे .
अजिंक्य पिसाळ म्हणाला की गौरीशंकर च्या शैक्षणिक संकुलात मला राष्ट्रभक्तीची खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली बालपणापासूनच भारतीय वायुसेनेचे असलेले आकर्षण व देशासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छाशक्ती मुळेच मी या क्षेत्राकडे वळलो आहे अर्थात यासाठी मला घरातील मिळालेले पाठबळ व बाळकडू याचा मला खूप लाभ झाला.
शैक्षणिक वर्ष सन 2022 – 23 मध्ये अजिंक्यने सी.बी. एस.ई नवी दिल्ली बोर्डाची परीक्षा दिली होती या परीक्षेत त्याला 94 टक्के गुण मिळाले होते पुढे बारावीला त्यास 80 टक्के गुण मिळाले होते त्यानंतर त्याने एन.डी.ए.ची परीक्षा देऊन संपूर्ण देशामध्ये रँक 383 मिळवला शालेय जीवनापासूनच शिक्षणाबरोबर कला क्रीडा क्षेत्राची विशेष आवड असल्याने एनडीएपर्यंतचा त्याचा प्रवास खऱ्या अर्थाने सुखकर झाला अजिंक्यने शालेय जीवनात असताना भुईज ते अहमदाबाद हा 750 किलोमीटरचा सायकल प्रवास करून एक विक्रम नोंदवला होता सध्या त्याची वाराणसी येथे इंडियन एअर फोर्स येथे निवड झाली आहे.
त्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप ,उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ.अनिरुद्ध जगताप ,जयवंतराव साळुंखे, अप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी अभिनंदन केले आहे.
