Home » Uncategorized » कोपर्डे हवेलीत कृषीदुतांकडून ‘कृषि शिक्षण दिन’ उत्साहात साजरा.

कोपर्डे हवेलीत कृषीदुतांकडून ‘कृषि शिक्षण दिन’ उत्साहात साजरा.

कोपर्डे हवेलीत कृषीदुतांकडून ‘कृषि शिक्षण दिन’ उत्साहात साजरा.

कोपर्डे हवेली-ग्रामीण कृषि जागरुकता कार्यानुभव आणि कृषि औद्योगिक संलग्न कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शासकीय कृषि महाविद्यालय कराडच्या विद्यार्थ्यांनी कोपर्डे हवेली गावात ‘कृषी शिक्षण दिन’ उत्साहात पार पाडला. सिद्धेश्वर विद्यालय कोपर्डे हवेली या माध्यमिक विद्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात कृषीदूतांनी कृषि शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश माध्यमिक विद्यार्थ्यांपुढे मांडला. याचबरोबर भारताचे पहिले राष्ट्रपती व कृषिमंत्री डॉ. राजेंद्र प्रसाद यांची जयंती साजरी करण्यात आली.

त्यांच्या जयंतीनिमित्त भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) ने हा दिवस नियुक्त केला. या दिवसाचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील विविध पैलू तसेच देशाच्या विकासातील कृषी क्षेत्राचा वाटा या बाबत जनजागृती करणे होय.

यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. उषा जगदाळे व शिक्षक श्री. निकम सर यांची उपस्थिती लाभली. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी कृषीदूत जयंत ताटे ,अभिजीत सूर्यवंशी, विजय सोळुंके ,सौरभ शेळके, विश्वजीत शिंदे ,प्रसाद आंबले आणि शिवरत्न देशमुख यांनी परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी पाटील, केंद्रप्रमुख डॉ‌. राणी निंबाळकर, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. राजेंद्र हसुरे , कार्यक्रम समन्वयक डॉ. उमराव बोंदर सर कार्यक्रम अधिकारी,‌ डॉ.धनंजय नावडकर , विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. ज्योती वाळके व विषय तज्ञ डॉ. नंदकिशोर टाले यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 16 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket