कूपर कॉर्पोरेशन आणि सिंफोनिया टेक्नोलॉजी यांच्यात भारत व परदेशात CPCBIV+ प्रमाणित एलपीजी जेनसेट्स उपलब्ध करण्यासाठी करार
सातारा, 27 जून 2024: कूपर कॉर्पोरेशन या महाराष्ट्रातील सातारास्थित, आघाडीच्या आणि इंजिन, इंजिनचे सुटे भाग व जनरेटर उत्पादक कंपनीला सिंफोनिया टेक्नोलॉजी या हरित वाहतूक उपकरणे, उर्जा नियंत्रण आणि एयरोस्पेस तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीसह भागिदारी जाहीर करताना आनंद होत आहे. भारत, जपान आणि इतर आशियाई देशांत क्रांतीकारी एलपीजी जेनसेट्स उपलब्ध करून देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.
या ऐतिहासिक भागिदारीमुळे शाश्वत उर्जा सुविधा तयार करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा नोंदवला गेला आहे, कारण कूपर कॉर्पोरेशनने सिंफोनिया टेक्नोलॉजीसह भागिदारीत तयार केलेला भारतातील अशाप्रकारचा पहिलाच 10 केव्हीए एलपीजी CPCBIV+ प्रमाणित जेनसेट उपलब्ध करण्यात आला आहे. CPCBIV+ ने भारतात घालून दिलेल्या कठोर उत्सर्जन निकषांचे पालन करत तयार करण्यात आलेला हा जेनसेट शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने मोठी झेप घेणारा असून त्यामुळे हरित उर्जा निर्मिती क्षेत्रात नवीन युगाची सुरुवात होईल. CPCBIV+ एलपीजी जेनसेट्सचे गॅस इंडिया एक्स्पो 2024 मध्ये 4- 6 जुलै दरम्यान एक्स्पो सेंटर ग्रेटर नॉयडा, उत्तर प्रदेश, भारत येथे होणार असलेल्या गॅस इंडिया एक्स्पो 2024 मध्ये अनावरण करण्यात आले.
कूपर सिंफोनिया जेनसेट मॉडेल नाव CSG-0010L-IN आणि त्याचे भारतातील ब्रँड नाव ‘DAIMON’ असेल, जे सिंफोनिया स्थित असलेल्या शहराचे नाव आहे. हेच उत्पादन जपानमध्ये कूपर कॉर्पोरेशन गेल्या 100 वर्षांपासून कार्यरत असलेल्या शहराच्या नावावरून ‘सातारा’ नावाने उपलब्ध केले जाईल. या जेनसेटमुळे ग्राहकांना विविध प्रकारचे लाभ, गुणवत्तापूर्ण कामगिरी, वाजवीपणा आणि विश्वासार्हता मिळेल. याचे उत्सर्जन मर्यादित असून ते चालवण्यासाठी येणारा कमी खर्च व सोपी देखभाल यामुळे हे उत्पादन पारंपरिक डिझेल जेनसेट्स आणि ग्रिड पॉवरच्या तुलनेत दर्जेदार आणि किफायतशीर पर्याय ठरेल. इतर उर्जा स्त्रोतांच्या तुलनेत एलपीजी पर्यावरणावर कमीत कमी परिणाम आणि जास्त कार्यक्षमतेसह हरित आणि शाश्वत इंधन पर्याय म्हणून वेगळा ठरतो.
सिंफोनिया ही बहुराष्ट्रीय जपानी कंपनी असून 2021 वर्ष अखेर त्यांची उलाढाल 94.5 बिलियन येन होती. 1917 मध्ये स्थापन झालेल्या या 100 वर्ष जुन्या कंपनीने विविध व्यावसायिक विभागांमध्ये प्रवेश केला आहे. त्यात ऑटोमोटिव्ह टेस्टिंग यंत्रणा आणि सुटे भाग, एयरोस्पेस, व्यावसायिक वाहने, औद्योगिक रोबोट्स, कंट्रोलर्स, प्रिंटर यंत्रणा, क्लच आणि ब्रेक्स, रिजनरेटिंग मेडिसिन्स आणि शेती यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे कूपर कॉर्पोरेशन ही सुद्धा सुटे भाग, डिझेल व गॅस इंजिन्स उत्पादन क्षेत्रातील 100 वर्ष जुनी कंपनी आहे. कंपनीचे 13 कारखाने कार्यरत असून ते सर्व साताऱ्यात वसलेले आहेत. कंपनीमधले 400 पेक्षा जास्त कर्मचारी 40 वर्षांपासून काम करत आहेत. कूपर कॉर्पोरेशनच्या व्यावसायिक उत्पन्नात निर्यातीचा वाटा अंदाजे 50 टक्के असून आतापर्यंतची एकूण निर्यात 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. फारूख एन. कूपर म्हणाले, ‘कूपर कॉर्पोरेशनमध्ये आम्ही उर्जा निर्मिती क्षेत्रात कायम नाविन्य आणि शाश्वततेला प्राधान्य दिले आहे. सिंफोनिया टेक्नोलॉजीजसह आमची भागिदारी अत्याधुनिक तसेच ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगली सेवा देणारी उत्पादने तयार करण्याच्या समान ध्येयातून तयार झाली आहे. एका खऱ्या पारसी उद्योजकाप्रमाणे आम्ही जे काम करतो, ते सर्वोत्कृष्ट असण्यावर भर देतो.’
श्री. कूपर यांच्या भावनेला दुजोरा देत सिंफोनिया टेक्नोलॉजी कं. लि. च्या सोशल इन्फ्रास्ट्रक्चर सेल्स सेक्शनचे व्यवस्थापक श्री. मासाकी तत्सुदा म्हणाले, ‘उद्योगक्षेत्रातील समीकरणे नव्याने प्रस्थापित करणारे आधुनिक एलपीजी जेनसेट्स उपलब्ध करून देण्यासाठी कूपर कॉर्पोरेशनसह भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. आमचे सामाईक कौशल्य आणि गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाप्रती बांधिलकी यांच्या मदतीने ग्राहकांना हरित भविष्याकडे नेणारी विश्वासार्ह, पर्यावरणपूरक उर्जा उत्पादने मिळवून देत सक्षम करण्याचे आमचे ध्येय आहे.
कूपर कॉर्पोरेशन आणि सिंफोनिया टेक्नोलॉजी यांच्यातील भागिदारी दोन्ही कंपन्यांची नाविन्य, शाश्वतता व ग्राहक समाधानाप्रती असलेली बांधिलकी दर्शवणारी आहे. या कंपन्या ऑन- रोड आणि ऑफ- रोड वापरासाठी एकत्रितपणे हायड्रोजन इंजिन्सची मालिका तयार करण्याच्या मार्गावर आहेत. जपान आणि अमेरिकासारख्या देशांत हायड्रोजन इंधन म्हणून प्रचलित होत आहे व भारतातही लवकरच इंधन म्हणून हायड्रोजनचा वापर होईल अशी चिन्हे आहेत. आपापल्या क्षेत्रातील एक्सपर्ट आणि शतकभराचा वारसा लाभलेल्या दोन्ही कंपन्या उर्जा निर्मिती क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी आणि पर्यावरणीय जबाबदारीचे नवे मापदंड प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहेत.