वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघांमध्ये आ.मकरंद पाटील यांच्याविरोधात ऍडव्होकेट निलेश डेरे यांचे नाव चर्चेमध्ये
प्रतिनिधी(अली मुजावर ): वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आ. मकरंद पाटील हे महायुतीतून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट आहे. लोकसभेला या मतदारसंघांमध्ये शरद पवार गटातून ‘तुतारीच्या उमेदवारास मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले होते. आमदार मकरंद पाटील यांना रोखण्यासाठी शरद पवार गटाकडून तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधामध्ये सर्वसामान्य घरातील उमेदवार दिल्यास निश्चितच या विधानसभा मतदारसंघांमध्ये बदल घडवून येऊ शकतो असे राजकीय जाणकारांना वाटते.आ.मकरंद पाटील हे महायुतीचे उमेदवार असल्याने महायुतीतील इतर घटक पक्षाला येथे प्रतिनिधित्व मिळणार नाही.त्यामुळे घटक पक्षातील इच्छुक महाविकास आघाडीच्या सान्निध्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
ऍडव्होकेट निलेश डेरे यांनी खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या माध्यमातून वाई तालुक्यात झालेली अतिवृष्टी असो किंवा कोविड सारख्या महामारीत उल्लेखनीय कार्य केले आहे. सर्वसामान्य लोकांसाठी निलेश डेरे यांनी अथक प्रयत्न केले आहेत. उच्च विद्याविभूषित आणि मितभाशी,सर्वसामान्य लोकांना आपला वाटणारा उमेदवार म्हणून शरद पवार गटाकडून तुतारी साठी निलेश डेरे आश्वासक उमेदवार आहेत. वाई खंडाळा महाबळेश्वर या मतदारसंघांमध्ये शरद पवार यांना मानणारा प्रचंड युवा वर्ग आणि ज्येष्ठ वर्ग आहे. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या खंडाळा वाई महाबळेश्वर मतदार संघामध्ये तुतारीचा उमेदवार बाजी मारू शकतो.