राज्यातील फार्मसी शाखेचे प्रवेश अखेर सुरू
सीईटी सेलने स्थगिती उठवली, महाविद्यालय यंत्रणा कार्यरत.
लिंब – राज्य सामाईक कक्ष (सीईटी सेल) यांनी राज्यातील पदवी व पदव्युत्तर शाखेतील (बी. फार्मसी, एम. फार्मसी) अभ्यासक्रमातील तिसऱ्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली होती. ही स्थगिती सीईटी सेलच्या निर्णयानुसार उठवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदवी व पदव्युत्तर शाखेतील प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा मार्ग खुला झाला आहे. वास्तविक औषधनिर्माणशास्त्र शाखेतील सर्व शाखेचे प्रवेश जुलै, ऑगस्ट 2024 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु राज्यातील अनेक नव्याने उभारलेल्या महाविद्यालयानी आखिल भारतीय फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली (पी.सी.आय) या शिखर संस्थेकडे औषधनिर्माणशास्त्र शाखेतील अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव सादर केले होते. नव्याने परवानगी मागणाऱ्या महाविद्यालयाच्या सर्व कागदपत्राची (प्रस्तावाची) पडताळणी व तज्ञांच्या देखरेखेच्या अधीन राहून या महाविद्यालयांना नव्याने औषधनिर्माणशास्त्र शाखेचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. परंतु शासनाच्या दोन केंद्रीभूत प्रवेश फेऱ्यांमध्ये या महाविद्यालयाचा समावेश झाला नव्हता अखेर या मान्यता प्राप्त महाविद्यालयांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालय समाविष्ट व्हावे यासाठी न्यायालयात धाव घेतली होती त्या आधारे राज्य सामाईक परीक्षा कक्ष (सीईटी सेल) यांनी राज्यातील सर्वच महाविद्यालयातील तिसऱ्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली होती. शैक्षणिक वर्ष सन 2024 – 25 च्या औषधनिर्माणशास्त्र शाखेतील प्रवेशास विलंब झाल्याने या शाखेत प्रवेश घेणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांमध्ये नाराजी सूर उमटविला होता परंतु आता सीईटी सेलने ही स्थगिती उठवल्याने या क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत महाविद्यालयाशी संपर्क साधून आपल्या शंकाचे निरसन करावे सुरुवातीच्या दोन फेऱ्यांमध्ये राज्यातील जवळपास 40% प्रवेश पूर्ण झाले असून तिसऱ्या फेरीतून महाविद्यालयातील सर्व प्रवेश क्षमतेने पूर्ण भरतील अशी महाविद्यालयांना अपेक्षा आहे.
दरम्यान सीईटी सेलने उठविलेल्या स्थगितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून तिसर्या् फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला आता सुरुवात झाली असून बी. फार्मसी व एम. फार्मसी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी दिनांक ते दिनांक पर्यंत जागा वाटप तर प्रवेश निश्चितीसाठी दिनांक ते दिनांक अशी मदत आहे दिनांक प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी
सीईटी सेलने प्रथम वर्ष औषध निर्माण शास्त्र पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमावरील स्थगिती उठविली आहे. प्रवेश विलंबामुळे निर्माण झालेल्या समस्या या पुढील काळात महाविद्यालय पुढे एक आव्हान राहणार आहे शैक्षणिक कामकाज व दैनंदिन अभ्यासक्रमाचे वेळापत्रक याची सांगड घालावी लागणार आहे. तिसऱ्या व अंतिम फेरीतील केंद्रीभूत प्रवेश फेरीच्या माध्यमातून रिक्त जागांमध्ये प्रवेशासाठी उत्सुक विद्यार्थ्यांना प्रवेशाचा मार्ग खुला झाला आहे. तिसऱ्या व अंतिम प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासन शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. विशेषत: शैक्षणिक वर्ष सन 2024- 25 मध्ये या अभ्यासक्रमाकडे प्रवेश घेणाऱ्या मुलींना आता शासन नियमाच्या अधीन राहून मोफत शिक्षणाची संधी मिळणार आहे. त्यामुळे यावर्षी या अभ्यासक्रमाकडे मुलींचा प्रवेशाचा ओढा वाढला आहे.
श्रीरंग काटेकर
जनसंपर्क अधिकारी
गौरीशंकर नॉलेज सिटी लिंब.