Home » राज्य » शिक्षण » बिलिमोरीया हायस्कूलमध्ये ‘आरंभ’; फेस्टिव्हलचे आयोजन; ६, ७ व ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये सहभाग घ्या- आदिती गोराडिया

बिलिमोरीया हायस्कूलमध्ये ‘आरंभ’; फेस्टिव्हलचे आयोजन; ६, ७ व ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये सहभाग घ्या- आदिती गोराडिया

बिलिमोरीया हायस्कूलमध्ये ‘आरंभ’; फेस्टिव्हलचे आयोजन; ६, ७ व ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये सहभाग घ्या- आदिती गोराडिया

दर्जेदार शिक्षणात ‘इंडियाज् रोल इन द वर्ल्ड’ ही प्रधान संकल्पना ठेऊन बिलिमोरीया हायस्कूलमध्ये ‘आरंभ’; फेस्टिव्हलचे आयोजन; ६, ७ व ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये सहभाग घ्या; आदिती गोराडिया यांचे आवाहन..

पांचगणी,दि.४ : कृतियुक्त शिक्षण आणि कलेतून ज्ञानप्राप्ती हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून व्यवसायाभिमुख शिक्षण हा अध्ययन अनुभव देणाऱ्या बिलिमोरिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी ‘आरंभ’- सेलिब्रेशन ऑफ भारत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत ‘ आरंभ ‘ २ फेस्टिव्हलचे ६, ७, ८ डिसेंबर अखेर आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बिलीमोरीया हायस्कूलच्या मॅनेजींग डायरेक्टर आदिती गोराडिया, पियुष कामदार व मुख्याध्यापक विशाल कानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बिलिमोरिया हायस्कूल मैदानावर शुक्रवार (दि.६ ) रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तर या तीन दिवसाच्या कार्यक्रमात बोलक्या बाहुल्या (मयुरेश), आर्टिस्ट एंटरटेनिंग (मुकिम तांबोळी), मानसिकता (विनय काप्री ) , तबला मेस्ट्रो (संजय अपार), म्युसिशियन (नॅथन इमॅन्युएल), सिंगर (आदी राव) , म्युसिशियन (तेजस) , ड्रम सर्कल (बिल्लीमोरिया हायस्कूल), म्युसिशियन (निखिल ) , सिटारिस्ट (उस्ताद रईस खान), बोलक्या बाहुल्या (योकी राव), म्युसिशियन (कॉर्ल्टन ब्रगांझा ) , राईटर फिल्मस्टार (नितीन भिलारे), इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल , ॲक्टर, राईटर, फिल्म मेकर (अमीन हाजी ) या मान्यवर कलाकारांचे स्टेज शो होणार आहेत. 

 भारतातील पहिल्या दहा निवासी शाळांमधील ही शाळा विद्यार्थ्यांचे संकल्पना स्पष्टीकरण,अध्ययन निष्पत्ती आधारित शिक्षण यावर भर देत आहे. सीबीएसई अभ्यासक्रमाधारित स्वतःचा, स्वतंत्र पाठ्यक्रम शाळेने तयार केला आहे. तांत्रिक शिक्षण, कला व जीवन कौशल्यांचा, क्रीडा गुणांचा विकास यावर भर देणाऱ्या या शाळेने आरंभ महोत्सवातून भविष्यासाठी दर्जेदार शिक्षणात ‘इंडियाज् रोल इन द वर्ल्ड’ ही प्रधान संकल्पना ठेऊन शैक्षणिक उपक्रमांची निर्मिती केली आहे. 

अलीकडच्या काळात शिक्षणाच्या संकल्पना बदलत असताना विद्यार्थांना त्यात सामावून घेण्यासाठी आनंददायी शिक्षण ही काळाची गरज असून ही संकल्पना आम्ही राबवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत. यामुळे भावी कलाकार, तंत्रज्ञ, अधिकारी होण्यासाठी मदत होणार असल्याचे मुख्याध्यापक विशाल कानडे यांनी सांगितले. 

तीन दिवस होणाऱ्या या महोत्सवासाठी विद्यार्थ्यांचे पालक तसेच परिसरातील नागरिक येणार असून या महोत्सवाची पूर्ण तयारी झाली आहे. तरी याचा लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन यावेळी पियुष कामदार व आदिती गोराडिया यांनी केले आहे. 

यावेळी बिलीमोरया हायस्कूल मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी बनवलेल्या बांबू पासून विविध वस्तू ,कलाकुसर केलेल्या वस्तू, कापड कला तसेच पेंटिंग, चित्रकला, कप प्रिंटिंग, बनियान प्रिंटिंग तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी बनवलेल्या खाद्य संस्कृतीतील देशातील सर्व पदार्थ याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला गुणांचा सांस्कृतिक कार्यक्रम या तीन दिवसाच्या आरंभचे आकर्षण असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहें.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 16 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket