आपला बोलवता धनी कोण –महेशबाबा जाधव
राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांनी कराड उत्तरचे आमदार आणि आमचे नेते मा.मनोजदादा घोरपडे यांचे विषयी पत्रकार परिषद मध्ये काही चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या 100% खोट्या आहेत. कोणाच्या सांगण्यावरून ते खोटे बोलत आहेत हे न उलगडणारे कोडे आहे असा पलटवार महेशबाबा जाधव यांनी केला.
प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हंटलेले आहे की आमदार मनोजदादा घोरपडे यांची सुरुवातीपासून भूमिका ही सर्वांना सोबत घेऊन सह्याद्रीची निवडणूक लढण्याची होती परंतु काही लोकांनाही निवडणूक दुरंगी होऊ द्यायची नव्हती. त्यामुळे कितीतरी वेळा बैठकी मोडण्यात आल्या. खरं वास्तविक आमदार मनोजदादा घोरपडे केवळ एकाच बैठकीला हजर होते. त्या अगोदर कितीतरी बैठका मोडण्यात आल्या, त्या का मोडण्यात आल्या हे न कळण्या इतपत कराड उत्तरची जनता अडाणी नाही.
धैर्यशीलदादा कदम, रामकृष्ण वेताळ,भीमरावकाका पाटील व संपतराव माने यांच्यासाठी पाच ते सहा सीट व निवास थोरात यांच्यासाठी तीन सीट अशा एकूण आठ ते नऊ सीट देण्याचे आमदारांनी मान्य केलेले होते. तरीही हा प्रस्ताव काही लोकांना मान्य न झाल्याने त्यांनी स्वतंत्र पॅनल टाकले.
निवडणूक जाहीर झाल्यापासून आपण वारंवार आमचे नेते आमदार मनोजदादा घोरपडे यांचे विषयी बोलत आहात यावरूनच आपला उद्देश स्पष्ट होतो. आपण नक्की कुणाला विरोधक मानून निवडणूक लढली हे सगळ्यांना कळून चुकलेले आहे. आपण वारंवार आमदारांना विधानसभेला मदत केली असं वक्तव्य करत आहात परंतु मी आपणाला आठवण करून देऊ इच्छितो की रहमतपूरच्या सभेमध्ये आपण माजी आमदारांच्या प्रचार सभेमध्ये स्टेजवर उपस्थित होता. आपल्यासाठी एवढा पुरावा भरपूर आहे. आणि सध्या जो आपण प्रकार चालवलेला आहे तो पूर्ण चुकीचा असून ज्या 2221 सभासदांचा तुम्ही उल्लेख करत आहात तुम्हाला तेवढे सुद्धा मतदान झालेले नाही हे विसरून चालणार नाही.
आपण म्हणत की आपला अर्ज आमदार मनोजदादा घोरपडे यांनी बाद केला.परंतु मी आपणास एक प्रश्न विचारू इच्छितो की जर आपण संस्थेचे देणे लागत नसता तर आपला अर्ज बाद झाला असता का? कर्ज काढले तुम्ही? ते थकवले तुम्ही? त्यामुळे आपला अर्ज बाद झाला आणि त्याच्यावरती हरकत ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेली आहे. जर आपण माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे विरोधक असता तर आपल्या अर्जावरती बाळासाहेब पाटील यांनी हरकत घेतली असती. ती का घेतली नाही? यावरून सर्व स्पष्ट होते. तेव्हा कुणाचं तरी ऐकून आमच्या नेत्यानवर बोलाल तर यापुढे आपल्यावरही बोलण्यास आम्हाला वेळ लागणार नाही असा इशारा महेश बाबा जाधव यांनी दिला.
