Home » देश » धार्मिक » आ.जयकुमार गोरेंचा दणदणीत विजयी चौकार

आ.जयकुमार गोरेंचा दणदणीत विजयी चौकार

आ.जयकुमार गोरेंचा दणदणीत विजयी चौकार

सातारा (अली मुजावर)-माण खटाव विधानसभेची रंगतदार आणि चुरशीची लढत जयकुमार गोरे यांनी एकतर्फी विजय खेचून आणत ४९,४९७ इतक्या मताधिक्याने चौथ्यांदा विजयी झाले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांना पराभूत केले.

जयकुमार, शेखर, आणि अंकुश गोरे तिन्ही भावांनी अहोरात्र घेतलेल्या कष्टामुळे माण तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती मध्ये मोठे मताधिक्य मिळाले. प्रभाकर घार्गे यांना माण मधून अनेक गावामध्ये मताधिक्य कमी मिळाले. तर खटाव मधूनही मोठ्या ग्रामपंचायतमध्ये जयकुमार यांना मताधिक्य मिळाले आहे. त्यामध्ये म्हसवड, दहिवडी, पळशी, मलवडी, गोंदवले, वरकुटे मलवडी, बिदाल, वडूज या मोठा गावामध्ये जयकुमार यांना मताधिक्य मिळाले आहे.

तब्बल पन्नास हजारांची आघाडी घेत आमदार जयकुमार गोरे यांनी माण खटाव मतदारसंघात विजयी चौकार मारला. या दणदणीत विजयातून त्यांनी नाद नाय करायचा जयकुमार गोरेचा हा खणखणीत इशारा विरोधकांना दिला. या विजयानंतर दहिवडी शहरात आमदार जयकुमार गोरे, शेखर गोरे, अंकुश गोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य जल्लोषी मिरवणूक काढली. यावेळी संपुर्ण शहरात आमदार जयकुमार गोरे यांच्या समर्थकांची लाट उसळली होती.

 

 

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 13 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket