“एक पेड मेरे माॅं के नाम” आणि “स्वच्छता ही सेवा” मोहीम २०२४ हा केंद्र शासनाचा उपक्रम अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यावर राबविण्यात आला
भुईंज :- (महेंद्रआबा जाधवराव )तुम्हाला मायेची ऊब हवी तर मग आईच्या नावे प्रत्येकाने एक वृक्ष लावावा आणि त्याला जगवावे. कारण पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी केंद्र शासनाने १४० कोटी जनतेच्या खांद्यावर १४० कोटी वृक्ष लागवडीची जबाबदारी सोपवली आहे. ‘एक पेड मेरे माॅं के नाम’ ही संकल्पना राबविण्याचा निर्धार सोडला आहे. आईच्या नावाने लावलेले झाड भविष्यात मुलांना नक्कीच सुखाची सावली देईल, यात दुमत नाही. असे प्रतिपादन अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मा. श्री. जिवाजी मोहिते साहेब यांनी केले.
एक पेड मेरे माॅं के नाम केंद्र शासनाच्या पर्यावरण वने आणि हवामान बदल विभागाचे सचिव लीला नंदन यांनी देशात नवीन योजना सुरू केली आहे. भारताची लोकसंख्या १४० कोटी असताना तेवढीच झाडे लागावी, याकरिता ‘एक पेड मेरे माॅं के नाम’ याला वृक्ष रोपवनाशी जोडलेले आहे. याच बरोबर भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम असलेली व ज्याचा उद्देश देशभरात स्वच्छता आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देणे आहे. अशी स्वच्छता ही सेवा मोहीम 2024″ अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यावर राबविण्यात आला.
या सेवाभावी उपक्रमात आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा साखर कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव सावंत, संचालक नितीन शिंगटे, डॉ. जयदीप चव्हाण, चीफ केमिस्ट श्री. सुरेश धायगुडे, यांच्या शुभहस्ते तसेच लेबर ऑफिसर रणजित चव्हाण, सेक्रेटरी श्री. बशीर संदे, शेती विभाग प्रमुख विलास पाटील व लालसिंग शिंदे, चीफ इंजिनियर रणजित पोळ, लेबर ऑफिसर ऍडव्होकेट रणजित चव्हाण,गार्डन विभाग प्रमुख प्रविण जाधव, सिव्हिल विभाग प्रमुख शिवाजी थोरात,संगणक विभाग प्रमुख दिग्विजय पाटील, डिस्टलरी मॅनेजर दिनेश चव्हाण,वरिष्ठ कक्ष अधिकारी सयाजीराव पाटील,वरिष्ठ टाईम किपर राजाराम कणसे, सॅनिटेशन अधिकारी संजीवन कदम, केनयार्डचे प्रमोद कुंभार, कांबळे साहेब तसेच गार्डन विभागाचे अधिकारी व स्वच्छता दूत कर्मचारी व महिला कर्मचारी उपस्थित होते.
