Home » राज्य » शेत शिवार » आरेवाडी तालुका कराड येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी तीन बकरया ठार

आरेवाडी तालुका कराड येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी तीन बकरया ठार 

आरेवाडी तालुका कराड येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी तीन बकरया ठार 

कराड – आरेवाडी ता. कराड येथील गुरवकी बेंद शिवारातील बंद जनावर गोटयामधील पत्रा उचकटून एक शेळी व तीन बकरी बिबट्याने ठार मारल्या आहेत. परिसरातील ग्रामस्थ प्रीतीच्या छायेखाली वावरत आहेत.   

आरेवाडीतील शेतकरी आनंद गणपती साळुंखे यांच्या शेतातील बंद शेडा मध्ये एक शेळी तीन बकरी होत्या . शेतकरी शेतात चारा देऊन घरी आल्यावर दुपारच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून गोठ्यातील एक शेळी आणि तीन बकरी ठार केल्या.त्यामुळे या परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या भागात असणारी  बिबट्याची दहशत कायम आहे.

गेल्या अनेक दिवसापासून तांबवे परिसरात गमेवाडी, आरेवाडी, पाठरवाडी,डेळेवाडी या भागांमध्ये बिबट्याचा अनेक दिवसापासून वावर आहे . बिबट्याच्या दहशतीमुळे शेतामध्ये काम करायला मजूर, शेतकरी जायला घाबरत आहेत. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती

Post Views: 13 छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय

Live Cricket