दीपक करंजीकर,भाग्यश्री देसाई यांचा शुक्रवारी सत्कार
दीपलक्ष्मी सभागृहात साहित्यिक गप्पाही रंगणार
सातारा आम्ही पुस्तकप्रेमी समूह व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रख्यात अभिनेते व लेखक दीपक करंजीकर आणि प्रख्यात अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.शुक्रवार दिनांक 7 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये दीपक करंजीकर यांचा सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते तर अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांचा सत्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सातारचे अध्यक्ष शिरिष चिटणीस यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी लेखक दीपक करंजीकर यांच्याबरोबर साहित्यिक गप्पा रंगणार असून डॉक्टर संदीप श्रोत्री व श्रीराम नानल हे दीपक करंजीकर यांच्याशी संवाद साधणार आहेत.या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन आम्ही पुस्तक प्रेमी समूह,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सातारा, आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांनी केले आहे.
