सरदार वल्लभाई हायस्कूल साखरवाडी या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील मैत्रीला 23 वर्षानंतर उजाळा
शालांत परीक्षा पास होऊन 2001 2002 मध्ये बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा मेळावा फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सरदार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज साखरवाडी, येथे पार पडला तब्बल 23 वर्षांनी एकत्रित आलेले मित्र व मैत्रिणी आज 23 वर्षांनी शाळेच्या त्याच वर्गातील बेंचवर बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा नकळत पाणवल्या.
2001- 2002 या कालावधीमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवून ताठ मानेने उभे आहेत, व्यावसायिक नोकरी उद्योग शेती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आघाडीच्या पदावर काम करत आहेत,
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्व एकत्र येवून स्नेह मेळावा आयोजित करू असे सर्व माजी विद्यार्थ्यांनी ठरवले होते प्रत्येकाने जुन्या मित्र-मैत्रिणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करून स्नेह मेळावा आयोजित करून सदर कार्यक्रम 2 फेब्रुवारी 2025 रोजी सर्व माजी विद्यार्थी व शिक्षक गण यांच्या समवेत पार पडला.
तसेच या वेळी सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र आले व संपूर्ण दिवस शाळेमध्ये घालवून सदर कार्यक्रमांत प्रत्येकाने प्रथम आपली ओळख सर्वांना करून दिली व आपली मनोगत व्यक्त करून त्या काळातील जुने किस्से सांगून आठवणींना उजाळा दिला तसेच यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी 2001-2002 या बॅच तर्फे 10 खुर्ची भेट म्हणून दिल्या यावेळी शाळेतील माजी शिक्षक शिक्षिका व शाळेचे प्राचार्य श्री जाधव सर उपस्थित होते. तसेच माजी शिक्षक श्री येवले सर, निंबाळकर सर टिळेकर सर प. रा.कदम सर वाघमोडे सर, फडतरे सर, एल के भोसले सर ,माडकर सर ,हुंबरे सर ,पुरोहित सर ,चोपडे सर तसेच सौ इंगळे मॅडम देवळे मॅडम माने मॅडम बडवे मॅडम व कांबळे ( माने ) मॅडम उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रवींद्र टिळेकर सर यांनी केले व आभार श्री राजेंद्र माडकर सर यांनी केले.
