Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » वाचनाने आपली विश्लेषण करण्याची क्षमता वाढते – कुलगुरु डॉ.ज्ञानदेव म्हस्के

वाचनाने आपली विश्लेषण करण्याची क्षमता वाढते – कुलगुरु डॉ.ज्ञानदेव म्हस्के

वाचनाने आपली विश्लेषण करण्याची क्षमता वाढते – कुलगुरु डॉ.ज्ञानदेव म्हस्के

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात वाचन कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न

डॉ.देवानंद सोनटक्के ,डॉ.अदिती काळमेख व वैदेही कुलकर्णी यांचे मार्गदर्शन

सातारा : ‘ वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा अतिशय महत्वाचा उपक्रम आहे. भाषेचे व बोलीचे संवर्धन होणे ही संकल्पना पुढे येत आहे. कोणतेही विषय शिकवताना भाषेचे महत्व अतिशय महत्वाचे ठरते. इकडे आड तिकडे विहीर ही मराठीतील म्हण कितीतरी सखोल अर्थ प्रकट होतो. खोल असलेल्या विहिरीत डोकावून पाहिले तर एक मनात भीतीच्या झिणझिण्या येतात त्याचे शब्दात वर्णन करता येत नाही. इकडे आड असो किंवा तिकडे विहीर असले तरी मरण निश्चित आहे. तुमचे शरीर सुद्धा बोलत असते. शरीराची देखील एक भाषा असते.. उजवी विचार सरणी व डावी विचार सरणी या संकल्पना अजूनही आपल्याला समजत नाहीत त्याच्या मुळाचा शोध आपण घेतला पाहिजे. माझ्या वडिलांनी मला ज्ञानेश्वरी वाचायला लावली. त्यावेळी ‘नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी ,एक तरी ओवी अनुभवावी’ हा विचार मला मिळाला ,तेंव्हापासून मी वाचत राहिलो. वाचनाने आपली विश्लेषण करण्याची क्षमता वाढते. वाचनच आपल्या जीवनाला मार्गदर्शन करीत असते. जगामध्ये अनेक भाषा आहेत त्यात आपली मराठी भाषा समृद्ध करण्याची जबाबदारी आपली आहे असे मत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांनी व्यक्त केले .ते छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये विद्यापीठाचे भाषा मंडळ व मराठी विभाग यांनी आयोजित केलेल्या ‘वाचन कौशल्य विकास कार्यशाळा उदघाटन कार्यक्रमात वाचनाचे मह्त्व सांगत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे हे उपस्थित होते. भाषा मंडळाचे संचालक डॉ.सुभाष वाघमारे ,आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.आर.आर.साळुंखे,मानव्यविद्या शाखा अधिष्ठाता डॉ.अनिल वावरे,वैदेंही कुलकर्णी ,डॉ. अदिती काळमेख ,डॉ.देवानंद सोनटक्के हे विषयतज्ञ यावेळी उपस्थित होते.

 डॉ. अनिल वावरे म्हणाले की २०१२ मध्ये पहिले युवा धोरण महाराष्ट्राने आणले .त्यावेळी तंत्रज्ञान पोचवण्याचा प्रयत्न सुरु झाला. १२ वर्षात तंत्रज्ञान वापर विद्यार्थी करत आहेत,पण याचा अतिरेक झाला ते पुस्तकापासून बाजूला गेले. वाचलेले आहे हे सत्य आहे का याचा शोध घ्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळविण्यासाठी शिकायचे असते केवळ परीक्षेसाठी नाही. आज समाज भरकटला आहे त्याला कारण आपण वाचनास वेळ दिला नाही. मोहनसिंग सिंग, डॉ.आंबेडकर ,यशवंतराव चव्हाण हे आपले मार्गदर्शक आदर्श आहेत असे म्हणाले

 

 कार्यशाळेच्या प्रथम सत्रात डॉ.देवानंद सोनटक्के यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले की २००३ राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम हे विद्यार्थ्याना प्रश्न विचारीत असत की ’आपण ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त झालो असे आपण म्हणतो ,पण असे का नाही दिसत की एकही देश भारताच्या तावडीतून मुक्त झाला? म्हणजे आपण कोणावरही राज्य केले नाही. याला कारण अज्ञान खूप होते. .सिंधू नदी ओलांडून जाऊ नये असे सांगितले जाई. ,प्रचंड अंधश्रद्धा होती. केशवपन प्रथा होती. धार्मिक आणि अध्यात्मिक ग्रंथ होते पण धर्मग्रंथ कुणी वाचावे यावरही बंदी होती. त्यामुळे ज्ञानापासून वंचित राहिलो. त्यासाठी समाजसुधारक यांना शिक्षणाची चळवळ उभी करावी लागली. महात्मा फुले,कर्मवीर,आगरकर,इत्यादींनी ज्ञान मिळविण्यासाठी काम केले. २००० साली आपण तंत्रज्ञान स्वीकारले आज उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अतिरेक झाला आहे. काही हजार कामगारांना काढून टाकले आहे. समाजमाध्यमांचा दुरुपयोग देशाला घातक ठरतो म्हणून ऑस्ट्रेलियाने समाज माध्यमे बंद केली आहेत. यंत्रे आली खरी पण त्यांना विवेक,भावना , कल्पना विचार नाही.यंत्र ज्ञान देत नाही. ज्ञानात समस्यांची सोडवणूक करण्याची क्षमता असते. बुद्धी आणि प्रतिभा यांना विकसित करण्यासाठी वाचन आवश्यक आहे. .यंत्रामुळे आपण आपली भाषिक रचना करण्याची क्षमता गमावून बसत आहोत. भाषा विकसित करण्यासाठी माणसाने खूप परिश्रम घेतले आणि जगातील सर्व अनुभव,ज्ञान संग्रहित केले.आपल्याला भाषिक समृद्धीसाठी शब्द हवे असतात.. आज १६५ बोली नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत . शब्द नष्ट झाला की पदार्थ नष्ट होतो. या पुढच्या काळात माणसाला यंत्राशी लढावे लागेल.. संवेदनशीलता ,विकसित करण्यासाठी भाषाच उपयोगी पडते. संवेदना ही भाषेत व्यक्त करण्यासाठी ,प्रतिभेची ,कल्पनेची आवश्यकता असते. माध्यमे तुमच्या संवेदनशीलतेचा, कल्पनाशक्तीचा ऱ्हास करत आहेत. आम्ही सांगू ते ऐका ,पहा,वाचा.. असे इथे असते .कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवाजवी वापर करून माणूस अशाने आपली विचार करण्याची क्षमता गमावून बसेल,असा इशारा त्यांनी दिला.

     कार्यशाळेच्या अंतिम सत्रात डॉ. अदिती काळमेख व वैदेही कुलकर्णी यांनी साहित्याचे विविध प्रकार आणि त्याचे वाचन सोदाहरण करून दाखविले. प्रगट वाचन करताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो,विराम चिन्हांचा वापर, शब्दोच्चार व शब्दांचे अर्थ यासंबंधीचे विस्तृत विवेचन त्यांनी केले .तसेच एकांकिका ,कथा बालकथा, वैचारिक लेख, ललित लेख ,कविता हा प्रत्येक साहित्य प्रकार वाचताना कशा पद्धतीने वाचला पाहिजे हे याचे प्रात्यक्षिक दाखविले .त्यात आकाशवाणीसाठी निवेदन करताना ते कशा पद्धतीने व्हावे लागते हेही त्यांनी सांगितले. सत्रात शेवटी सहभागी विद्यार्थ्यांनी काही कवितांचे सादरीकरण केले. भावना व्यक्त करताना वाचन कसे करावे याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. कार्यशाळेचे प्रास्ताविक कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे संचालक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.विद्या नावडकर यांनी केले .या कार्यशाळेसाठी मराठी विभागातील डॉ.आबासाहेब उमाप, डॉ.विद्या नावडकर डॉ.संजयकुमार सरगडे , प्रा.प्रियांका कुंभार व प्रा.श्रीकांत भोकरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेस विद्यार्थी ,प्राध्यापक मिळून १५० जण सहभागी झाले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पुण्यात हत्या झालेली ती तरुणी कराड तालुक्यातील तरुणीवर चाकू हल्ला होत असताना पाहत होती लोकं  

Post Views: 603 पुण्यात हत्या झालेली ती तरुणी कराड तालुक्यातील  पुणे : पुण्यातील आयटी कंपनीतील तरुणीच्या खुनाचा करण्यात आला होता.आर्थिक

Live Cricket