सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल ह.भ.प. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेतर्फे रूपाली राजपुरे व राजेंद्रशेठ राजपुरे यांचा सत्कार दुष्काळग्रस्त ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील दुष्काळी परिस्थितीत गायरान व वैयक्तिक जमिनीवर अतिरिक्त चारा पिकांच्या लागवडीला मान्यता-रोहयो मंत्री भरत गोगावले माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरे डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान पेन्शनधारकांना घरपोच मिळणार सेवा दुष्काळाच्या संकटाचे संधीत रूपांतर करा; कायमस्वरूपी टंचाईमुक्तीसाठी नियोजनबद्ध कामे करा – जिल्हाधिकारी संतोष पाटील 
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » अपने तो अपने होते है अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात

अपने तो अपने होते है अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात

“अपने तो अपने होते है” अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात

माण खटावमध्ये दोन भावांमधला संघर्ष मिटला असून जयकुमार गोरे यांना निवडून आणण्यासाठी शेखर गोरे संपूर्ण ताकतीनिशी रिंगणात उतरले आहेत. 

सातारा -जयकुमार गोरेंच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत परंतु निवडणुकीमध्ये शेखर गोरे यांची भूमिका महत्त्वाची होती.माण-खटाव विधानसभा मतदारसंघात साधारण पंधरा ते वीस वर्ष दोन भावांमधला संघर्ष वारंवार पाहायला मिळाला आहे. जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे असा हा संघर्ष आजपर्यंत या मतदारसंघाने पाहिला आहे. परंतु या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आता जयकुमार गोरे यांना आमदार करण्यासाठी शेखर गोरे संपूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. शेखर गोरे जयकुमार गोरेंचा प्रचार करणार.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तिकीट नाकारल्यानंतर शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा शेखर गोरे यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी राजकीय भूमिका जाहीर केली नव्हती. मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत अखेर शेखर गोरे यांनी त्यांचे बंधू जयकुमार गोरे यांचे विधानसभेला काम करणार असल्याचे जाहीर केले.शेखर गोरे यांच्यामुळे माण खटाव विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपची ताकद वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघात आता राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.

 

 

 

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल ह.भ.प. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेतर्फे रूपाली राजपुरे व राजेंद्रशेठ राजपुरे यांचा सत्कार

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल ह.भ.प. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेतर्फे रूपाली राजपुरे व राजेंद्रशेठ राजपुरे यांचा

Live Cricket