साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न
Home » राज्य » मी उमेदवार असताना घार्गेंची अस्मिता कुठे होती ? -डॉ. येळगावकर

मी उमेदवार असताना घार्गेंची अस्मिता कुठे होती ? -डॉ. येळगावकर

मी उमेदवार असताना घार्गेंची अस्मिता कुठे होती ? –डॉ.येळगावकर

पाणी चळवळीशी विरोधकांचा सुतराम संबंध नाही 

सातारा : प्रतिनिधी  प्रभाकर घार्गे खटाव तालुक्याच्या अस्मितेच्या आणि सन्मानाच्या नुसत्या बाता मारत आहेत. २००९ साली मी विधानसभा निवडणूकीला उभा होतो तेव्हा त्यांनी माणच्या पोळ तात्यांचे काम केले होते. तेव्हा त्यांची खटाव तालुक्याबद्दलची अस्मिता कुठे गेली होती असा सवाल डॉ. दिलीप येळगावकरांनी उपस्थित केला. आ.जयकुमार गोरेंच्या विरोधात एकत्र आलेल्यांचा पाणी चळवळीशी सुतराम संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले.

    सिध्देश्वर कुरोली येथे महायुतीचे उमेदवार आ. जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

   डॉ. येळगावकर पुढे म्हणाले,मी १९८९ पासून माण – खटावच्या पाण्यासाठी संघर्ष केला आहे. आत्ता जे विरोधात आहेत त्यातील कुणीच माझ्याबरोबर पाणी चळवळीत नव्हता. त्यांनी कधी पाण्यासाठी संघर्ष आणि आंदोलने केली नाहीत. आ. जयकुमार गोरेंनी विधानसभेत, मंत्रालयात खूप मोठा संघर्ष करुन जिहेकठापूर, उरमोडी, तारळीचे पाणी आणले आहे. या योजनांसाठी त्यांनी हजारो कोटींचा निधी खेचून आणला आहे. आता पाणी यायला लागल्यावर विरोधक श्रेय घेण्यासाठी पाणी चळवळींचा दिखाऊपणा करत आहेत. शरद पवारांनी मला पाण्याचे अश्वासन दिले होते पण त्यांनी ते कधीच पूर्ण केले नाही. जयंत पाटलांनी तर टेंभूचे पाणी माण आणि खटावला देताच येत नाही असे सांगितले होते. जयकुमार गोरेंनी मात्र फेरजलनियोजनातून अडिच टीएमसी पाणी आणले आहे. 

    डॉ. येळगावकर पुढे म्हणाले, ज्या राष्ट्रवादीने त्रास दिला त्या राष्ट्रवादीसमोर प्रभाकर घार्गे नाक घासत आहेत. त्यांना आत्ता खटाव तालुक्याचा सन्मान आठवला आहे. २००९ साली मी विधानसभेला उभा होतो तेव्हा त्यांना मदत करण्याची विनंती केली होती. मी खटाव तालुक्यातील असूनही घार्गेंनी तेव्हा मला मदत केली नव्हती. तेव्हा त्यांची खटाव तालुक्याबद्दलची अस्मिता कुठे गेली होती. घार्गेंसाठी आम्ही बरेच काही केले आहे, मात्र त्यांनी आमचा विश्वासघात केल्याचेही येळगावकरांनी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket