कराड मधील सर्वसामान्य जनतेचा सवाल हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्ण नातेवाईकांना सुद्धा पार्किंगला सुद्धा पैसे द्यायचे चॅरिटेबल ट्रस्ट नावाला का? अशा उमेदवाराला सर्वसामान्य नागरिकांचे मत मिळणार का?
सातारा : कराड दक्षिण मधील विधानसभा निवडणूक रंगदार अवस्थेत आली आहे. सातारा न्यूज मीडिया सेव्हनच्या प्रतिनिधींनी कराड मधील सर्वसामान्य जनतेची संवाद साधला असता आमचे मत हे विकास काम करणाऱ्या आणि कराडचे नाव उंचावणाऱ्या उमेदवाराला देणार असल्याचे लोकांनी सांगितले.गतनिवडणुकीत नऊ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवणार्या आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा सलग तिसर्या निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ.अतुल भोसले यांच्याशी सामना होत आहे.
कराड मधील नागरिकांशी संवाद साधला असता विकास कामाबरोबरच सर्वसामान्य जनतेशी असणाऱ्या नेतृत्वालाच आम्ही मत देणार असल्याचे लोकांनी सांगितले.




