साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टिमचे सर्वत्र कौतुक

प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टिमचे सर्वत्र कौतुक

मौजे कुंभरोशी येथे नाग सर्पाला मिळाले जिवदान प्रतापगड सर्च अॅन्ड रेस्क्यू टिमचे सर्वत्र कौतुक

प्रतापगङ महाबळेश्वर तालुक्यातील वाङा कुंभरोशी येथे मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. एक नाग जातीचा सर्प घरातील खिडकीच्या लोखंडी जाळीत अडकला होता. नागाला जाळीच्या बारीक छिद्रातून बाहेर येणे अश्यक्य झालेने तो चिडला होता व फुसकरत होता त्या घरातील व शेजारील लोक घाबरले होते .

      स्थानिक नागरिकांनी तात्काळ प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमला याबाबत कळवले असता टीमचे सदस्य सर्पमित्र अजित जाधव, संकेत सावंत, दर्शन जाधव आणि अविष्कार केळगणे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम परिस्थितीचे आकलन करून नागाला कोणतीही इजा न होता बाहेर काढण्याचे नियोजन करून त्यांनी एक्सा ब्लेड आणि पक्कड या साधनांचा वापर करून लोखंडी जाळी कापली. त्यानंतर त्यांनी नागाला सावधपणे पकडून जंगलात त्याच्या अधिवासात सोडले. या संपूर्ण कारवाईत नाग सर्पाला कोणतीही इजा झाली नाही.

प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी नागाला सुखरूपपणे त्याच्या अधिवासात सोडून पर्यावरणातील घटकाची एकप्रकारे सेवा केली आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket